Home Breaking News राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी येथील प्राध्यापक संशोधक डॉ....

राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी येथील प्राध्यापक संशोधक डॉ. अविनाश चल्लेलवार यांना स्वित्झर्लंडमधील परिषदेस निमंत्रण..!

0
13

चंद्रपूर : राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर येथील गणित विभागातील सहाय्यक प्राध्यापक तथा वैदिक गणित संशोधक डॉ. अविनाश चल्लेलवार यांना स्वित्झर्लंडमधील University of Bern येथे ‘रिसोर्स पर्सन’ (विषयतज्ञ) म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या संशोधन कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात असल्याचे या निमंत्रणावरून स्पष्ट होत असून ही बाब शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद मानली जात आहे.
University of Bern, Switzerland येथे आयोजित शैक्षणिक संवाद सत्रात डॉ. चल्लेलवार हे “Indian Knowledge System and Culture with Vedic Maths” या विषयावर विद्यार्थ्यांशी तसेच संशोधकांशी संवाद साधणार आहेत. भारतीय ज्ञान प्रणाली, संस्कृती आणि वैदिक गणिताच्या माध्यमातून प्राचीन ज्ञानपरंपरेतील वैज्ञानिकता, तर्कशुद्धता तसेच गणितीय पद्धतींचे महत्त्व यावर सखोल चर्चा होणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
डॉ. चल्लेलवार गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय प्राचीन शास्त्र आणि वैदिक गणित या विषयांवर संशोधन करत असून त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधनपर विचार मांडले आहेत. त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्यामुळे परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये भारतीय ज्ञानपरंपरेबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
त्यांच्या या यशामुळे चंद्रपूर–गडचिरोलीसह संपूर्ण देशाचा गौरव वाढला असून शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. भारतीय परंपरेतील ज्ञानाचा जागतिक स्तरावर प्रसार करण्याच्या दृष्टीने हे निमंत्रण महत्त्वपूर्ण मानले जात आहे. तसेच भारतीय संशोधकांना मिळणाऱ्या आंतरराष्ट्रीय मान्यतेचे हे प्रतीक ठरत असून तरुण संशोधकांसाठीही हे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
डॉ. अविनाश चल्लेलवार हे राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर येथे गणित विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून अप्लाइड मॅथेमॅटिक्स तसेच प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरा, विशेषतः वैदिक गणित या विषयात संशोधन व अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्यांना “वैदिक गणित गुरुरत्न २०२५” या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
या यशाबद्दल सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. विनोद दत्तात्रेय तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या निमंत्रणामुळे भारतीय ज्ञानसंपदा आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम जागतिक स्तरावर मांडण्याची मोठी संधी निर्माण झाली असून विद्यार्थ्यांसाठी हे प्रेरणादायी उदाहरण ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here