Home Breaking News सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे यशस्वी युवक कार्यकर्ते सोहम बुटले यांनी दाखवली तत्परता –...

सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे यशस्वी युवक कार्यकर्ते सोहम बुटले यांनी दाखवली तत्परता – धोकादायक जागा काही तासांतच झाली सुरक्षित.!

0
42

चंद्रपूर :- हवेली गार्डन परिसरातील अस्थाविनायक कॉलनीजवळील सिमेंट रस्त्यावर इलेक्ट्रिक पाइप टाकण्यासाठी खोदलेले खड्डे आणि बाहेर आलेल्या लोखंडी सळ्यांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. वृद्ध महिला आणि तरुणी यांना या ठिकाणी अपघात होताच, स्थानिक नागरिकांनी समस्या घेऊन सोहम सुधर्शन बुटले यांच्याकडे धाव घेतली.

सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या युवक कार्यकर्त्याच्या नात्याने मिळालेली जबाबदारी पार पाडत सोहम बुटले यांनी केवळ २ तासांत आयुक्तांकडे पाठपुरावा करून, अभियंता व कंत्राटदारांना घटनास्थळी बोलावून त्वरित उपाययोजना राबवल्या.

आज त्या सळ्या काढून रस्ता पुन्हा सुरक्षित करण्यात आला!

“मा. सुधीरभाऊंच्या कार्यपद्धतीचं अनुकरण करत, मी नागरिकांच्या सेवेसाठी कायम तत्पर राहीन.” — सोहम सुधर्शन बुटले, अध्यक्ष, युवा वॉरियर्स, चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here