गिरड विशेष प्रतिनिधी
प्रमोद झिबड
समुद्रपुर
दिनांक ७ जून २०२५ वर्धा जिल्हा समुद्रपुर तालुक्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील जाम वरून उत्तरेस ७ की.मी.अंतरावर
हळदगाव (शिवनी)पाटी जवळ जामसावली वरून देवदर्शन करून परत येत असतांना मांडगाव येथील दुचाकीस्वाराने उभ्या ट्रकला धडक दिली.या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. प्राप्त माहितीनुसार शनिवारी ७ जुनला दुपारी २ वाजताच्या सुमारास मांडगाव येथील रहिवासी दिनेश मोहुर्ले व ज्ञानेश्वर डडमल हे दोघे दुचाकीने जामसावली येथून देवदर्शन करून गावकडे परत येत असतांना हळदगाव पाटीजवळ उभ्या असलेल्या आर.जे.३२ जी. सी ७६७८ क्रमांकाच्या ट्रकला दुचाकी जाउन भिडली या अपघातात दिनेश मोहुर्ले याच्या डोक्याला जबर मार लागून जागीच मृत्यू झाला. तर ज्ञानेश्वर डडमल हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती समुद्रपुर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविले या अपघाताची नोंद समुद्रपुर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार रविंद्र रेवतकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.


