विशेष गिरड प्रतिनिधी
प्रमोद झिबड
समुद्रपुर
दिनांक १ जून २०२५ ला. हिंगणघाट येथे स्वतःची इंडिगो विकून त्यांला रुग्णवाहिकेचे रूप देऊन त्या रुग्णवाहिकेचे आज 1 जूनला काही दिव्यांगाच्या हस्ते समाजासाठी अर्पण करण्यात आली.
रुग्णमित्र गजू कुबडे यांनी शहरातील अत्यावश्यक रुग्णांना मदत मिळत नव्हती. हीं गरज ओळखून गजू कुबडे यानी लोकवर्गणी करून त्यांना त्यांच्या मित्रपरिवाराने दिलेली इंडिगो वाहनं विकून त्या आलेल्या पैशात जुनी ओम्नी कंपनीची रुग्णवाहीका विकत घेतली. व ती दुरुस्त करून नवा रुग्णवाहिकेचा लूक दिला. शहरातील गोरगरीब जनतेला सोयीचे व्हावे म्हणून आज दि 1 जूनला तिचे लोकार्पण राजू पपंनवर, पिंटू कावळे, या दिव्यांगा च्या हस्ते करून एक आदर्श निर्माण केला आहे.
हीं रुग्णवाहिका राष्ट्रीय महामार्गवरील अपघातग्रस्त रुग्णांना रुग्णालया पर्यन्त व रस्त्यावर बेवारस म्हणून भटकणाऱ्या मतिमंद व्यक्तींना आश्रमापर्यन्त पोहचविण्यासाठी हीं रुग्णवाहीका मोफत देण्यात येणार आहे.
गजू कुबडे यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे.


