विशेष गिरड प्रतिनिधि
प्रमोद झिबड
समुद्रपुर.
दिनांक ३० मे २०२५.वर्धा जिल्ह्यातील तालुका समुद्रपुर वायगाव ( हळद्या) येथे शेतकरी संगीता गंगाधर कळमकर यांचे शेतामध्ये झाडाच्या सावलीत खड्यात लागवडी करीता साठऊन ठेवलेले हळदीचे बेन लागवडी करीता बाहेर कडाण्या करीता मजूर शेतात गेले होते. हळदीचे बेन टोपल्यात भरतांना मोठा अजगर साप मजुराच्या हातामधे आला.
![]()
त्यावेळी वायगाव (ह) पोलिश पाटील आशिष पाटील यांनी सर्पमित्र रोहित बढ़ेल व यांची भाची सर्पमित्र कुमारी यशिका समुद्रे रा.समुद्रपुर यांना मोबाईल फोन करून बोलावण्यात आले.मामा भाची यांना अजगरला पकडून अजगाची १० ते ११ फूट लंबाई आणि वज़न 9 किलो 270 ग्राम आहे असे सर्पमित्र बडेल यांनी सांगितले.आणी आजगर साप खुर्सापार गिरड जंगलामध्ये सोडून दिले. यावेळी उपस्थित (पोलिस पाटील )आशिष पाटील व गावकरी मंडळी विठ्ठल कारवटकर, अशोक झिबड,किशोर पाटील, प्रकाश मोगरे, लहू कळमकर इत्यादि.


