प्रमोद झिबड
गिरड विशेष प्रतिनिधि.
दिनांक २३ एप्रिल २०२५ ला दुपारी वेळ १२ च्या दरम्यान कामानिमित्त हिंगणघाट कडे जात असताना हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारुती सुझुकी शोरूम आजंती जवळ गाडी क्रमांक MH.32 AA.9458 ह्या मोटर सायकल ला अज्ञान वाहनाने धडक देऊन रोडवर पडल्याने डोक्याला गंभीर मार लागून जागेवर त्याचा मृत्यू झाला त्याला आई वडील एक भाऊ एक बहीण आणि जावई आप्त परिवार आहे. तो नेहमी समाजकार्य मध्ये अग्रेसर राहत होता. गरिबांना मदत करायचा असाच एक व्यक्ती महत्त्व आपल्यातून गमावला संपूर्ण सावंगी नगरीत शोकाकुल वातावरण पसरला आहे.


