Home Breaking News परडा येथील अमोल खुरसंगे यांचा घराला विद्युत लाईन मुळे आग लागल्याची शक्यता.

परडा येथील अमोल खुरसंगे यांचा घराला विद्युत लाईन मुळे आग लागल्याची शक्यता.

0
54

प्रमोद झिबड

गिरड विशेष प्रतिनिधी.

 

भागवत साप्ताहच्या समारोप प्रसंगी महाप्रसादाला गेले असता लागली आग. घरातील धान्य, टीव्ही, फर्निचर, लाकडी दरवाजा सहित दीड लक्ष रुपयाचे नुकसान.

समुद्रपूर –तालुक्यातील परडा या गावी अमोल सुभाष खुरसंगे यांचा घराला रविवार दि. 20 एप्रिल च्या रात्री 8 ते 8.30 वाजेदरम्यान एका एक आग लागली. त्यावेळेस अमोल आणि घरातील सर्वजण परडा येथील भागवत सप्ताह च्या समारोप निमित्य महाप्रसादाचा कार्यक्रम होता, त्यात अमोल वगैरे हे ही महाप्रसाद घेण्या करिता गेले होते.

अचानक आग लाग्याने लोक धावून येऊन आग विझावण्याचे प्रयत्न केल्याने आग विझली, तेव्हा पर्यंत घरातील अन्न धान्य, टीव्ही, फर्निचर, लाकडी दरवाजे, कपडे सहित सर्व जळून खाक झाले होते. त्यात अमोल खुरसंगे चे अंदाजे दीड लक्ष रुपयाचे नुकसान झाल्याची चर्चा आहे. घराच्या वरुण विद्युत लाईन गेली असल्याने शॉट शर्किट ने आग लागली असे काही लोकांचे म्हणने आहे.रात्री जवळपासच्या घर शेजारी लोकांनी खुरसंगे परिवाराला रात्रभर झोपण्याची वेवस्था करून दिली. तहसीलदार कपिल हाटकर यांना माहिती मिळताच महावितरण च्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन चौकशी करण्याचे सांगितले.

अमोल खुरसंगे ला महाराष्ट्र शासन, महावितरण,विधायक आमदार समीरभाऊ कुणावार, सामाजिक संघटनानी साहाय्य करावे अशी मागणी परडा गावातील लोकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here