Home Breaking News वर्धा-हिंगणघाट येतील जम्मू कश्मीरमधे अडकलेले सर्व पर्यटक सुखरूप घरी परतले..! ...

वर्धा-हिंगणघाट येतील जम्मू कश्मीरमधे अडकलेले सर्व पर्यटक सुखरूप घरी परतले..! जम्मू – कश्मीर (पहलगाम) येथे भारतीय पर्यटकांवर आतंकवाद्यांनी गोळीबार करून २७ नागरिकांना जिवे मारले. 

0
38

 

 

गिरड विशेष प्रतिनिधी

प्रमोद झिबड

समुद्रपुर

 

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट व नागपूर यतील फिरायला गेलेल्या पर्यटकांमध्ये अनेक पर्यटक हे वर्धा जिल्ह्यातील देखील होते. सर्व नागरिकांना आपल्या स्वगृही परतण्याकरिता शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब च्या पुढाकाराने सर्वांना जम्मू ते मुंबई विमान प्रवासाने महाराष्ट्रात आणल्या गेले. तसेच मुंबई ते नागपूर स्वगृही जाण्याकरिता स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात आली.

शुक्रवार दि. २५ एप्रिल ला सर्व प्रवासी समृद्धी महामार्गाने प्रवास करत पुलगाव येथे दु. ३ वाजता पोहोचले. युवासेना जिल्हाप्रमुख मंगेश रावेकर यांनी त्यांची भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी केली व ठीक ८ वाजता वर्धेवरून बस हिंगणघाट डेपोला पोहोचली, तेव्हा बसमध्ये ३५ नागरिक होते. यामध्ये हिंगणघाट येथील ७ प्रवासी होते. सर्व परतलेल्या नागरिकांना ज्यूस व थंड पेयजलाची व्यवस्था हिंगणघाट बस स्थानक येथे शिवसेना शहर प्रमुख प्रशांत लहामगे यांनी केली.

 

स्वगृही परतलेल्या नागरिकांनी एकनाथजी शिंदे साहेबांचे आभार व्यक्त केले. प्रत्येक तालुक्याच्या बस स्थानकाला नागरिकांची विचारपूस करून जेवन-नाश्ता-पाण्याची व्यवस्था करावी असा आदेश खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी युवासेनेला दिला होता. त्याची पालन करत शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश ईखार, रवी धोटे उपजिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनात व युवा सेना जिल्हाप्रमुख महेश मुडे यांच्या पुढाकाराने आलेल्या सर्व प्रवाशांची विचारपूस करण्यात आली. घरी सुखरूप पोहोचल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पण मृत पावलेल्या लोकांबद्दल त्यांनी दुःख देखील व्यक्त केले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख – प्रशांत लहामगे, भाजप युवा मोर्चा शहर महामंत्री – स्वप्निल सुरकार,शिवसेना पदाधिकारी राहुल टेंभूर्णे, आतिष सातपुते,अमित काळे, योगेश अतकर, बालू पुरी, युवा सेनेचे, हर्षल थूल, शुभम मेंढे, असंग जामगडे, यश फुसाटे,प्रतीक पाटील,अक्षय जयसिंगकर, योगेश ढोकपांडे, गुरु गेडाम,पवन डफ,अजय नाटकर, दिलीप फुसादे, निखिल गेडाम,लाखनसिंग,धीरज सुपारे, धनराज अण्णा वाडेकर,होमराज बावणे,सचिन बावणे, अजय बावणे, कुंदन चंदेल,आदी मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here