Home Breaking News महेन्द्रा फायनन्सच्या कर्जामुळे गळफास घेऊन आत्महत्या.

महेन्द्रा फायनन्सच्या कर्जामुळे गळफास घेऊन आत्महत्या.

0
51

प्रमोद झिबड

गिरड विशेष प्रतिनिधी

 

दिनांक २० एप्रिल२०२५: वर्धा जिल्हा समुद्रपुर तालुक्यातिल वायगाव (हळद्या) येथिल रहिवाशी लक्ष्मन मंगलुजी गुजरकर वय ६० यांनी आपल्या राहत्या घरी घराच्या अँगलवर दोर बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली.त्यांच्यावर महेंद्रा फायनन्स कंम्पनिचे दिड लाख रुपयांचे कर्ज होते.महेंद्रा फायनन्स च्या कर्मचाऱ्यांचा कर्ज परत करण्यासाठी खूप तगादा असल्याने तो विचलित झाला होता. काही व्यवस्था होत नसल्याने लक्ष्मण गुजरकरने आपल्या जीवाची पर्वा नकर्ता गळफास घेऊन आत्महत्या केली.ते पि.व्हि टेक्सटाईल जाम येथिल ते कर्मचारी होते.सप्टेंबर २०२४ ला त्यांचे सेवानिवृत्त झाले होते. त्यांना ४००० रुपये पेंशन मिळत होते. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,सून,नातु असा आप्तपरीवार होता. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here