Home Breaking News राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरद चंद्र पवार गट ) द्वारे कुक्कुट पालन...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरद चंद्र पवार गट ) द्वारे कुक्कुट पालन प्रोजेक्टच्या विरोधात समुद्रपूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा.!

0
50

राजु कांबळे

तालुका प्रतिनिधी 

समुद्रपुर.

 

समुद्रपुर : वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुका अंतर्गत येत असलेल्या चिखली ( उमरी ) या गावाशेजारी कुक्कुट पालनाचे मोठे प्रोजेक्ट उभारलेले आहे. त्यामुळे या गावातील लोकांचे, छोट्या मुलांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. या कुक्कटपालनामुळे समस्त गावकरी त्रस्त झालेले आहे. 

त्यामुळे या प्रोजेक्टला मिळालेली परवानगी तात्काळ रद्द करावी अशा मागणी करिता चिखली ( उमरी ) गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाद्वारे ( शरदचंद्र पवार गट ) समुद्रपुर तहसील कार्यालयावर आज धडक मोर्चा काढण्यात आला.

 

समुद्रपुर तहसीलदार साहेबांना निवेदन देवून समस्त गावकऱ्यांच्या व लहान मुलांच्याआरोग्याला होत असलेल्या धोक्यामुळे परवानगी तात्काळ रद्द करावी असे या निवेदनात मागणी करण्यात आली असून

या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक, महिला यांचा समावेश दिसून आला. या मोर्चा करिता समुद्रपूर पोलीस ठाण्या द्वारे जबरदस्त चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here