Home Breaking News कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात नागरिकांचे सहकार्य मोलाचे : तहसीलदार कपिल हाटकर.!

कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात नागरिकांचे सहकार्य मोलाचे : तहसीलदार कपिल हाटकर.!

0
79

 

गिरड विशेष प्रतिनिधि

प्रमोद झिबड

समुद्रपुर.

दि.१२ मार्च २०२५ ला .समुद्रपुर येथे ठाणेदार संतोष शेगावकर यांचा नागरी सत्कार : नागरी सत्कार समिती व पत्रकार संघांचे आयोजन..!

प्रशासकीय आणि शासकीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात अधिकाऱ्याची महत्त्वाची भूमिका असली तरी सामान्य माणसाचा सिंहाचा वाटा असतो त्यातही कर्तव्यशिल आणि कर्तव्यान अधिकाऱ्यांचे संयोगातून शासकीय प्रणालीचा सुयोग्य अवलंबातून सामान्य नागरीकांना न्याय मिळतो. समुद्रपुर पोलीस ठाण्याचे माजी ठाणेदार संतोष शेगावकर यांनी हा सहयोग साधला. असे मत तहसीलदार कपिल हाटकर यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.

समुद्रपुर तालुका पत्रकार संघ आणि नागरी सत्कार समिती व मित्र परिवाराच्या वतीने माजी ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या निरोप समारंभाप्रसंगी ते व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार कपिल हाटकर होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून नवनियुक्त ठाणेदार रविद्र रेवतकर, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ मॅडमवार, नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष बाबाराव थुटे, जेष्ठ पत्रकार सुधीर खडसे, प्रा. मेघश्याम ढाकरे, माजी सरपंच रमेश भोयर, अशोका उद्योग समूहाचे सन्नी पटेल, आदी प्रामुख्याने उपस्थिती होती. पुढे बोलतांना तहसीलदार हाटकर म्हणाले की, माझ्या १२ वर्षाच्या कारकिर्दीत ठाणेदार संतोष शेगावकर सारखा धाडसी व कर्तबगार अधिकारी मी अजून पाहिला नाही त्यांच्या सोबत काम करतांना त्यांनी अनेक प्रसंगात धाडसी निर्णय घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली अश्या कर्तबगार अधिकाऱ्यांचा नागरी सत्कार समारंभात सहभागी होणे हे. माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. असे मत व्यक्त केले.

यावेळी नगरपंचायतींचे नगरसेवक प्रा. मेघश्याम ढाकरे यांनी समुद्रपुर शहरातील पोलीस ठाण्यार्तगत विविध प्रासंगिक घटनेतील ठाणेदार संतोष शेगावकर यांनी बजावलेल्या कर्तव्याला उजाळा दिला.यावेळी समुद्रपुर तालुका पत्रकार संघाच्या वतीने माजी ठाणेदार तथा जिल्हा वाहतूक अधिकारी ठाणेदार संतोष शेगावकर यांना शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन जेष्ठ पत्रकार सुधिर खडसे, प्रा. मेघश्याम ढाकरे, बंडूजी बन, प्रफुल्ल कुळे, विलास नवघरे, अमोल झाडे, मनिष गांंधी, किशोर आस्कर,बादल वानकर, कृष्णा धुळे,अब्दुल कदिर,

प्रमोद झिबड, प्रदिप डगवार यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी निर्भीड लोकक्रांतीचे गजानन गारघाटे, अमोल झाडे, विलास नवघरे, तसेच सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हा सरपंच सचिन गांवडे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख विलास नवघरे, तालुका उपअध्यक्ष मुरलीधर चौधरी यांनी सन्मानित केले.तसेच हरीओम बाबा गोशाळा, नगर पंचायत येथील पदाधिकाऱ्यांकडून सुध्दा सत्कार करण्यात आला.सत्कारमूर्ती संतोष शेगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त करितांना म्हणाले की, जनतेच्या सहकार्याशिवाय कायदा सुव्यवस्था राखणे शक्य नाही. मला समुद्रपूर परिसरातील नागरिकांचे मोलाचे सहकार्य मिळाले. यातूनचं मी कर्तव्याची अंमलबजावणी करू शकलो. म्हणतं भावनिकता प्रगट केली.

यावेळी कार्यक्रमात प्रास्ताविक भुमिका मांडताना पत्रकार गजानन गारघाटे यांनी गांधीं विनोबांच्या कर्मभूमीत गेल्या एक दशकापासून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत सामान्यांना न्याय देणारा अधिकारी म्हणून संतोष शेगावकर यांंची खरी ख्याती आहे.म्हणून त्यांनी विविध प्रसंग घटना मांडल्या .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिष गांंधी यांनी केले. तर आभार पत्रकार प्रदिप डगवार यांनी मानले.या कार्यक्रमात समुद्रपुर शहरातील मान्यरवर अशोकभाऊ डगवार,

लहानुजी गांजिमवार , देवरावजी खोब्रागडे, जीवतोडे काकु,कोरम ताई ,तसेच पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here