प्रमोद झिबड
गिरड विशेष प्रतिनिधि
समुद्रपुर.
पोषणशक्ती प्रधानमंत्री निर्माण योजनेअंतर्गत राज्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शिक्षण विभाग पंचायत समिती समुद्रपुर यांच्या द्वारा तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन पंचायत समिती समुद्रपूर च्या सभागृहात करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.रोषणकुमार दुबे गटविकास अधिकारी पंचायत समिती समुद्रपुर, श्री.ललितकुमार बरसागडे शिक्षणं विस्तार अधिकारी,नरेश वाघ,सचिव बालरक्षक प्रतिष्ठान,सुनील मांडवकर मुख्याध्यापक, मातुरे सर मुख्याध्यापक,विशेष शिक्षक सागर गजभिये ,राजेश हजारे,विकास पाटील ,अनिल राऊत संदीप वाघमारे अरविंद राठोड, प्रमुख पाहुणे उपस्थित होते. स्पर्धे मध्ये तालुक्यातील 10 केंद्रातील शाळांमधील स्वयंपाकी व मदतनिस यांनी सहभाग घेतला..
स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या निकषाप्रमाणे फोर्टीफाईड तांदूळाचा वापर, तृणधान्याचा वापर, पाककृतीची दैनंदिन आहारातील उपयोगिता,पाककृतीची चव, मांडणी नाविण्यपूर्णता, पाककृती बनविण्याची कृती सुलभता व इंधन बचत इत्यादी स्पर्धेच्या दृष्टीने उपयुक्त बाबी विधारात घेऊन पाककलेचे सादरीकरण करत पौष्टिक खाद्यपदार्थ बनविले होते. परीक्षकांनी
बनविण्यात आलेल्या खाद्यपदार्थांची चव चाखत स्पर्धेचे मूल्यांकन केले व सोबतच निकाल जाहीर केला.
तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रतिभा गोपीचंद आत्राम जि.प.शाळा बोडखा ,शारदा विठ्ठल वाटकर नेताजी सुभाषचंद्र बोस वि. वाशी द्वितीय क्रमांक अर्चना हिवरकर जि.प. शाळा हळदगाव ,आशा अजय पवार पी.एम. श्री.जि. प उच्च प्राथमिक शाळा समुद्रपुर तृतीय क्रमांक मंजुषा दिपक धरत जि.प. प्राथमिक शाळा मांडगाव ,मीना मुरलीधर शिवणकर जि.प. कन्या शाळा गिरड यांनी प्राप्त केला .प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त स्पर्धकांना बक्षीस रोख स्वरूपात मिळणार आहे. कार्यक्रमाचे संचालन नरेश वाघ यांनी तर आभार सुनील मांडवकर यांनी मानले. यशस्वितेसाठी सर्व केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले.


