प्रमोद झिबड
गिरड विषेश प्रतिनिधी
समुद्रपुर
दि.९ मार्च २०२५ हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील महिला मोर्चाच्या वतीने काल दि.८ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला .
![]()
उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन आमदार समीरभाऊ कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या भाजपा जिल्हा उपाध्यक्षा अर्चनाताई वानखेडे यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच डॉ. प्रणाली सायंकार यांनी स्त्रियांचे आजार व महिलांच्या वाढत्या समस्या यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले तर डॉ. कीर्ती दिघे यांनी देखील महिलांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमा दरम्यान हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या कु. पूजा धोपटे या युवतीचा हृदय सत्कार करण्यात आला . सोबतच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वर्धा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा अर्चनाताई वानखेडे, स्त्री रोगतज्ञ डॉ. प्रणाली सायंकार, माजी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती दिघे , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष छाया सातपुते,विधानसभा प्रमुख नलीनी सयाम, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष कौसर अंजुम , भाजपा महिला शहराध्यक्ष रविला आखाडे , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, विधानसभा प्रमुख संजय डेहणे इत्यादी मान्यवरां सोबतच महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी मान्यवर सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संचालन रवीला आखाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. रजनी सावळे यांनी केले


