प्रमोद झिबड
विशेष प्रतिनिधी गिरड
समूद्रपुर.
![]()
दि.26 फेब्रु 25.मांडगाव तीर्थक्षेत्र नगरीत श्री संत बऱ्हाणपुरे महाराज यांच्या शिष्या श्री संत मैनामाता यांचा ६५ वा पुण्यतीथी सोहळा आठवडी बाजार चौक श्री संत मैनामाता देवस्थान येथे भक्तीमय वातावरणात मोठ्या जल्लोष्यात आणि उत्साहात साजरा करण्यात आला
या कार्यक्रमा निमीत्त ह भ प प्रविण महाराज काटकर यांचे संगीतमय भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते भावीकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले पारंपारिक भारूड , गोंधळ व काकड आरती पालखी प्रदक्षीणा भागवत कथा हरिपाठ भजन कीर्तन प्रवचन तसेच वीवीध साप्ताहिक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मॉं. भवानी गोंधळी संच वायगांव (हळद्या)
संगीत गोंधळ गायक
व संबळ वादक
प्रमोद देवराजी झिबड,
(गायन कोर्स) व तूनतूना वादक
प्रमोद विठ्ठलराव खडतकर ,
(गायन कोर्स) व मांजिरा वादक
गणेश गणपतराव श्रावने ,
(गायन कोर्स) व खंजेरी वादक संजय मारोती वहाडे ,
(गायन कोर्स)आर्गन वादक
![]()
लक्ष्मणराव मुडे यांचा गोंधळ कार्यक्रम पार पडला यावेळी मंदिर परीसरात भव्यदिव्य मंडप उभारून रोषनाई करण्यात आली शुक्रवार २८ फेब्रुवारी ला पहाटेपासूनच पुजा अर्चना करून दर्शनाला भक्तांची गर्दी झाली होती ह .भ.प. प्रवीण महाराज काटकर यांच्या हस्ते काल्याचे किर्तन करून गावातील मुख्य मार्गांने दिंडी पालखी भजनी मंडळी व अश्व नृत्य सादर करत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यात लहान थोर वृध्दांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता गावोगावची भक्तमंडळी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते पालखी मिरवणुक मंदीरात पोहचल्यानंतर आरती करून प्रसाद वितरण व महाप्रसादाला सुरवात करण्यात आली संपूर्ण भक्तमंडळी गावकरी पाहुणेमंडळी यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


