Home Breaking News विद्या विकास महाविद्यालयाचे वतीने राबविण्यात आला मिशन स्कुल कनेक्ट 2020.

विद्या विकास महाविद्यालयाचे वतीने राबविण्यात आला मिशन स्कुल कनेक्ट 2020.

0
67

प्रमोद झिबड

गिरड विशेष प्रतिनिधि 

समूद्रपुर.

दि.26 फेब्रुवारी 25 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ,नागपूर यांचे निर्देशानुसार मिशन स्कुल कनेक्ट 2020 राबवून तालुक्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाला भेटी देऊन विद्या विकास महाविद्यालयाने नवीन शैक्षणिक धोरण 2020 ची माहिती देण्यात आली

रातुम नागपूर विद्यापीठ च्या निर्देशानुसार परिसरातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यन्त नवीन शैक्षणिक धोरण 2020 ची माहिती पोहचविणे आवश्यक असल्याने विद्या विकास कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समुद्रपूर चे प्राचार्य डॉ किशोरचंद्र रेवतकर यांचे अध्यक्षतेखाली मिशन स्कुल कनेक्ट 2020 ची समिती नेमण्यात आली व त्या मध्ये महाविद्यालयातील डॉ शिल्पा समदूरकर,प्रा सदानंद सारवे,डॉ नितीन आखूज,डॉ गणेश बेले,डॉ मिलिंद कांबळे,डॉ अर्चना भेंडे,डॉ स्वाती येवतकर या प्राध्यापकावर जबाबदारी टाकण्यात आली होती व परिसरातील कनिष्ठ महाविद्यालय,व शाळा येथे NEP 2020 न्यू एज्युकेशन पॅलिसी बद्दल माहिती देण्यात आली सदर उपक्रम हा विकास विद्यालय समुद्रपूर, विकास कनिष्ठ महाविद्यालय,गिरड,सरस्वती विद्यालय धोंडगाव, यशवंत कनिष्ठ महाविद्यालय, माडगांव,संस्कार ज्ञानपीठ समुद्रपूर, मुक्ताबाई विद्यालय समुद्रपूर, जे डी चौधरी कनिष्ठ महाविद्यालय वासी,मातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालय हिंगणघाट या कॉलेज मध्ये न्यू एज्युकेशन पॅलिसी 2020 याबाबत नवीन युवा पिढीला माहिती व्हावी यासाठी ज

हा उपक्रम विद्या विकास महाविद्यालय समुद्रपूर तर्फे राबविण्यात आला.

सदर उपक्रम डॉ शिल्पा समदूरकर याचे नेतृत्वाखाली राबविण्यात आला असून सदर उपक्रमला प्राचार्य डॉ किशोर रेवतकर ,उपप्राचार्य डॉ नयना तुळसकर यांनी शुभेच्छा दिल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here