Home Breaking News पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या किसान सन्मान राज्य स्तरीय मध्ये क्रिशोन्नती शेतकरी प्रोडूसर कंपनी...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या किसान सन्मान राज्य स्तरीय मध्ये क्रिशोन्नती शेतकरी प्रोडूसर कंपनी या कंपनीचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.!

0
65

प्रमोद झीबड 

गिरड विशेष प्रतिनिधि 

समूद्रपुर.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 19 व्या हप्ता वितरण या राज्यस्तरीय कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर वनामती येते उत्कृष्ट उत्पादक कंपनी आणि शेतकऱ्यांचा सत्कार केला.

यामध्ये क्रिशोन्नती शेतकरी प्रोडूसर कंपनी या कंपनीचा सत्कार करण्यात आला क्रिशोन्नती शेतकरी प्रोड्युसर कंपनी ही मागील 2017 पासून शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीच्या भागधारकांना नैसर्गिक शेती करीत प्रोत्साहित केले आहे यामध्ये 500 हेक्टर वर नैसर्गिक शेती हा प्रकल्प सुरू केलेला आहे तसेच भागधारकांना माती परीक्षणासाठी कंपनी स्तरावर माती परीक्षण प्रयोगशाळा स्थापन केली आहे, नाबार्ड यांच्या माध्यमातून वायगाव हळद उत्पादित शेतकऱ्यांना भौगोलिक मानांकन नोंदणी करता पुढाकार घेतला आहे तसेच कृषी सेवा केंद्राच्या अंतर्गत भागधारकांना बांधावर खते, बी बियाणे,औषधे स्पिंकर स्प्रेपंप, ताडपत्री पुरवठा केला जातो, स्मार्ट प्रकल्प अंतर्गत हळद प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला आहे तसेच पोखरा प्रकल्पाच्या माध्यमातून अवजार बँक स्थापन करून भागधारकांना कमी दरामध्ये सुविधा पुरविल्या जातात तसेच भागधारकांना कर्ज पुरवठा सुद्धा केला जातो नाबार्ड आणि बजाज फाउंडेशन यांच्या माध्यमातून व्हेजिटेबल मार्केटिंग व्हॅन सुद्धा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केली आहे वायगाव हळद एक्सपोर्ट सुद्धा केली आहे. यामधे कृषी प्रदर्शनी सुद्धा लावलेली होती. क्रिशोन्नती शेतकरी प्रोडूसर कंपनीचे श्री. पितांबर बा.घुमडे यांनी आशिष जयस्वाल – राजमंत्री अर्थ आणि नियोजन,विधी व न्याय यांना हळद पावडर पॅक देऊन नैसर्गिक पद्धतीची हळदीबद्दल सविस्तर माहिती दिली.या सर्व कंपनीच्या कार्याची दखल घेऊन मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते क्रिशोन्नती शेतकरी प्रोडूसर कंपनी वायगाव हळद्या कंपनीचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या उपस्थित कंपनीचे अध्यक्ष श्री पितांबर घुमडे व कंपनीचे सचिव श्री नितेश स्थूल उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here