प्रमोद झिबड
विशेष प्रतिनिधी गिरड
समूद्रपुर.
![]()
दिनांक २५/०२/२०२५ समुद्रपूर : – स्थानिक अवतार मेहेर बाबा चॅरीटेबल ट्रस्ट द्वारा आयोजित अवतार मेहेर बाबा यांचा १३१ वा जन्मोउत्सव सोहळा उत्साहाच्या वातावरणात पार पडला .
या वेळेस माजी ग्रा.पं. सरपंच रमेशराव भोयर यांच्या हस्ते मंगल कलश व दिप प्रज्वलन करण्यात आले तसेच विद्या विकास महाविद्यालयाचे प्रा .मेघश्याम ढाकरे यांचे हस्ते सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करून प्रार्थना व आरती करण्यात आली . यावेळी चॅरीटेबल ट्रस्टचे पदाधिकारी महीला , पुरुष तसेच भाविक उपस्थित होते . त्याच प्रमाणे मेहेर नामाचा जप करून अवतार मेहेरबाबा यांचा जन्मोउत्सव साजरा करून त्रिवार घोषणा व स्थानिक महिलांनी पाळणे , भजन प्रार्थना व आरती करण्यात आली . सकाळी अवतार मेहेरबाबा यांच्या प्रतिमेसह शहरातील प्रमुख मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली . शोभायात्रेला अवतार मेहेरबाबा बँड पार्टी वायगाव (हळद्या),दुपारच्या सत्रात केशवराव कुवारे ( देवळी ) यांनी बाबाच्या जिवनाविषयी प्रवचन करून माहीती दिली . त्यानंतर समुद्रपूर येथिल स्थानिक महिला मंडळाने भजने सादर केले . सायंकाळी स्वर सपना संगीतमय मेहेर गितगायन , संपन्न झाले . आरती प्रार्थना , भजने आदी कार्यक्रम झाले . ५ ते ६ हजार भाविक भक्तांनी या प्रसंगी महाप्रसादाचा लाभ घेतला .
अवतार मेहेरबाबा जन्मोउत्सव सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी अवतार मेहेरबाबा आध्यात्मिक चॅरीटेबल ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी तसेच गावातील तरूण युवक युवतीनी आदिनी सहकार्य केले .


