मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट.
समुद्रपूर. : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी द्वारा ही परीक्षा घेण्यात आली असून समुद्रपूर तालुक्यात 25 केंद्रावर ही परीक्षा यशस्वी रित्या पार पाडण्यात आल्या आणि सर्व केंद्रावर 100% विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
यात समुद्रपूर,दहेगाव, जाम, परडा, नंदोरी, निंभा, कवठा, किनी खर्डा,कोरा, ऊसेगाव,साखरा, मंगरूळ ताडगाव, पिंपरी, शिवणफळ, पाईकमारी, , धोंडगाव, उमरी, चापापुर,केसलापार, खापरी, आणि गिरड केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा समुद्रपूर तालुक्यात पाच गटात घेण्यात आली.
प्रवेश परिचय, प्रवीण, ग्रामनाथ,ग्रामगीता,रत्न ही परीक्षा ग्राम विकास जीवन विकास परीक्षा जिल्हाध्यक्ष श्री. मनीषजी जगताप यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये पार पडली.संत साहित्य व तरुण पिढीला संस्कार देण्याकरिता ही परीक्षा संपूर्ण भारतभार पाच भाषेमध्ये राबविला जाते. श्री. गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक शहरापासून तर खेड्यापर्यंत ग्रामगीता जीवन विकास परिषदेचा प्रचार प्रसार करतात. या परीक्षेतून राष्ट्रीय एकात्मता, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, संत साहित्य व संस्कार ही शिकवण या परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली जाते याच माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराजांच्या साहित्याचा प्रचार प्रसार लाखो करोडो लोकापर्यंत पोहोचवा, या संस्कारचा ठेवा घराघरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य सर्व ग्रुप प्रचारक करीत असतात.
या परीक्षा यशस्वी करण्याकरिता समुद्रपूर तालुक्यातील ग्रामगीता जीवन विकास परिषदेचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका सेवा अधिकारी विष्णू ब्राह्मणवाडे विजय बारेकर, प्रकाश धारणे, मनीष जांभूळे, मंथन भांदककर, विलास टोहकर विनायक श्रीरामे, किशोर तांदुळकर, वैभव अंड्रस्कर,अमोल डोंगरे, प्रफुल कूडे, महेंद्र बुटे, झाडे सर,पंढरे सर,रामाजी देवडे, मनिषा बचरे,गणेश शेंडे, शरद तडस, अभिजीत डाखोरे, राजूजी कांबळे सर,ओम प्रकाश मुडे सर, मायाताई चाफले मॅडम , दिलीप महाजन सर या सर्वांनी अथक परिश्रम घेतले.


