Home Breaking News दीड वर्षाचे चिमुकलीसह आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.!

दीड वर्षाचे चिमुकलीसह आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.!

0
52

मनवर शेख

ब्युरो चीफ 

हिंगणघाट.

8 फेब्रुवारी हिंगणघाट तालुक्यातील फुकटा पती-पत्नीत झालेल्या किरकोळ वादावादी नंतर पतीने पत्नीच्या कानशिलात थापड मारल्याने मनस्ताप झाल्याने पत्नीने आपल्या दीड वर्षाचे चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळ देण्यात घटना वडनेर पोलीस ठाण्या अंतर्गत फुकटा येथे दि.६ रोजी रात्री ८ वाजताचे दरम्यान घडली.

मृत महिलेची शशिकला पिंटू घुले (२५) अशी असून दुदैवी दीड वर्षीय बालिकेचे नाव कविता पिंटू घुले असे आहे.

सदर घुले कुटुंबीय हे यवतमाळ जिल्ह्यातील कळंबनजिकच्या परसोडी येथील रहिवाशी असून त्यांचा मेंढीपालनाचा व्यवसाय होता.

याच व्यवसायानिमित्त हे मेंढपाळ कुटुंबीय हिंगणघाट तालुक्यातील फुकटा मेंढ्या चारण्यासाठी घेऊन आले होते.

घटनेच्या दिवशी त्यांनी मेंढ्या चारून आणल्या नंतर त्यांना जाळी मध्ये कोंडणे होते, परंतु काही मेंढ्या शेजारच्या शेतात उभ्या पिकात शिरल्यामुळे मृतक महिलेचे पतीने तिला मेंढ्या परत आणण्यास सांगितले परंतु पत्नी त्याचे बोलण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पतीने रागाचे भरात तिच्या गालावर थापड मारून तिला मेंढ्या परत आणण्यास सांगितले, पतीने रागावल्याचा पश्चाताप झाल्याने या महिलेने तिचे दिड वर्षांच्या चिमुकलीला घेऊन मेंढ्या आणायला गेली, सदर दुदैवी प्रकार फुकटा येथील शेतकरी वरघणे या यांचे शेतात घडला. या घटनेचा तिच्या मनावर खोलवर परिणाम झाल्यामुळे तिने विहिरीत स्वतःचे चिमुकलीसह उडी घेऊन जगाचा निरोप घेण्याचे निर्णय घेतला, मृत आरोपी महिलेने आपल्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन या इहलोकाची यात्रा संपवली.

पतीला याची कल्पना येतात त्याने गावकऱ्यांना मदतीसाठी बोलावले. अमृत आई व बालिकेचे मृतदेह विहिरीचे बाहेर काढण्यात आले. मृतक महिलेच्या माहेरच्या आई ,भाऊ व इतर नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली, पोलीस चौकशी दरम्यान त्यांनी पतीविषयी कोणतेही तक्रार नसल्याचे सांगितले.

मृत महिला व तिच्या चिमुकलीचे ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे काल शुक्रवारी शवविच्छेदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here