Home Breaking News जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा समारोप सोहळा संपन्न.!

जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा समारोप सोहळा संपन्न.!

0
54

सय्यद इसा 

जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड.

 

माहूर:- जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य प्रांगणात काल दहावी व बारावीच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम व मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय गणेश कचकलवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल माडपेलीवार, उपाध्यक्ष समाधान कांबळे, पत्रकार फिरोज भाई पठाण, पत्रकार राज ठाकूर व शाळेचे मुख्याध्यापक मनोहरण तसेच शाळेच्या सचिव शितल भवरे मॅडम हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष भाग्यवानजी भवरे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि अध्यक्षीय समारोप केला या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आहेफाज शेख यांनी केले तर कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन सुधीर गौरखेडे यांनी केले अशा प्रकारे हा कार्यक्रम पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here