निलंबन मागे घेन्यासाठी जिलाधिकाऱ्यांना निवेदन.!

0
11

 

 

भद्रावती : येथिल जिल्हा परीषद हायस्कुल मधे सन् २०२१ पासुन आदर्श मुख्याध्यापक, कर्तव्यदक्ष,शिस्तप्रीय असा लौकीक प्राप्त झालेले श्री. अरविंद चौधरी यांना दिनांक २.१.२०२५ ला मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परीषद चंद्रपुर यांनी निलंबित केले आहे. अचानक झालेल्या निलंबन कारवाई मुळे शाळेतील विद्यार्थी, पालक व सुज्ञ नागरिकांमधे असंतोषाचे वातावरण आहे . मुख्याध्यापक अरविंद चौधरी सन् २०२१ साली रुजु झाल्यापासुन शाळेची गुणवत्ता,दर्जा विकसित करन्यावर भर दिला.घरोघरी जावुन विद्यार्थी शाळेत दाखल करने, गरीब व होतकरु विद्यार्थ्यांचे कौशल्य ओळखुन त्यांना शैक्षणिक मदत करने, आत्मविश्वास वाढविने,

शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लावने,कमीतकमी ५ विद्यार्थी ८० टक्के ते ९५ टक्के गुण मिळवून देन्यासाठी प्रत्यक्ष लक्ष पुरविने ई. क्षमता असलेले मनमिळाऊ मुख्याध्यापकांवर खोटेनाटे आरोप लावुन त्यांना निलंबन करने हे कुनाच विद्यार्थी, पालक व सुज्ञ नागरिकांना आवडले नाही.

त्यांचेवर झालेल्या या निलंबन कृतीचे संपूर्ण शहरात असंतोषाचे वातावरण असुन निलंबनामागे खाजगी शिक्षण संचालकांचे अदृश्य षडयंत्र असल्याचा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत.कारण जि.प.चे विद्यार्थी दहीवीच्या परीक्षेत शंभर टक्के ऊत्तिर्ण होत असुन बहुतेक विद्यार्थी ८० ते ९५ टक्के गुण प्राप्त करीत आहेत.ही बाब खाजगी शाळा संचालकांच्या डोळ्यात खुपत आहे.खाजगी शाळांना विद्यार्थी कमी मिळत आहे.ऐन परीक्षेच्या तोंडावर सुड भावनेतुन केलेल्या निलंबनामुळे या वर्षी दहावीचा निकाल कमी लागला तर याला जवाबदार कोन ? प्राथमिक शिक्षणाधिकारी की मुख्य कार्यपालन अधिकारी.असा प्रश्न पालक विचारीत आहे.

मुख्याध्यापकांवर लावलेले आरोप सपशेल खोटे आहे. एक आरोप असा आहे, मुख्याध्यापकांनी शाळेच्या परीसरातील सागवान झाडे तोडुन भ्रष्टाचार केला.सागवान झाडांची कटाई शासनाकडुन (नगर परिषद भद्रावती ) परवानगी घेवुनच केलेली आहे.अन्य एक आरोप आहे,शाळेतील विद्यार्थी अडखळत वाचन करतात. कुठल्याही शाळेचे शंभरच्या शंभर विद्यार्थी मराठी, हिंदी, इंग्लिश फाडफाड वाचु शकत नाही.

असले आरोप निरर्थक आहे.

वरिल सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करुन, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हीत लक्षात घेवून मुख्याध्यापक श्री अरविंद चौधरी यांचेवर सुड भावनेतुन केलेली निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घेन्यात यावि, निलंबन रद्द करुन पुर्ववत त्यांना जिल्हा परीषद हायस्कुल भद्रावती येथेच रुजु करन्यात यावे.

अशा आशयाचे निवेदन माहिती अधिकार,पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना व ऑल इंडिया नॅशनल करप्शन कमिटी तर्फे महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षा सौ.किर्ती पांडे यांनी मा.तहसिलदार भद्रावती मार्फत मान.जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना दिले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here