मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट.
आज दिनांक 22 जानेवारी 2025 रोज बुधवारला सकाळी 6:00 वाजता वाघीनीच्या पिलाचा धोंडगाव च्या समोर मुनेश्वर नगर जवळ हायवेवर अपघात झालेला असून, वाघीनीच्या पिलाचा जागीच मृत्यू झालेला आहे. वनविभागाच्या निर्देशानुसार वाघीण आता चवताडलेली व बिथरलेली असेल. ती आता कोणावरही हल्ला करू शकते. त्यामुळे धोंडगाव, हुसेनपूर, शिरपूर, भवानपूर, हिवरा, वडगाव अंतरगांव, गिरड व सर्व परिसरातील शेतकरी, मजूरवर्ग व नागरिक* यांनी सतर्क राहावे. मुख्यत्व धोंडगाव येथील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आज शेतात जाऊ नये. असे आव्हान वनविभाग,(समुद्रपूर) पोलीस प्रशासन,( गिरड) तथा पोलीस पाटील यांनी केले आहे आहे.


