मनवर शेख
ब्यूरो चीफ़
हिंगणघाट.
![]()
वर्धा: वर्धा नुकताच पार पडलेल्या साउथ एशियन मास्टर चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये शंभर मीटर रिले खेळात गिरड पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल देवेंद्र उडान यांनी दुसरा क्रमांक प्राप्त करीत सिल्वर मेडल मिळविले व जिल्ह्याचे नाव लौकिक केले या स्पर्धेमध्ये श्रीलंका. नेपाळ. अफगाणिस्तान. बांगलादेशा सारखे अन्य देशाचे मास्टर्स खेळाडू सहभागी झाले होते ही स्पर्धा दिनांक 10 जानेवारी 2025 ते 14 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये मंगला स्टेडियम मंगलोर कर्नाटक येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये साउथ एशियन राष्ट्राचे जवळपास बाराशे खेळाडू विविध मैदानी स्पर्धेमध्ये सहभागी झाली होते वयाच्या तीस वर्षापासून ते शंभर वर्षापर्यंत सर्व वयोगटातील खेळाडूंमध्ये अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन करीत खेळाला वयाचे बंधन नसते हे दाखवून दिले या स्पर्धेसाठी वर्धा जिल्ह्यातील जवळपास 11 खेळाडू सहभागी झालेले होते त्यामध्ये वर्धा जिल्हा व ग्रामीण पोलीस दलाचे मनीष देशमुख. आशिष देशमुख. देवेंद्र उडान. तसेच शालेय शिक्षण विभागातील .प्रा. प्रवीण शेळके. देवेंद्र सोनटक्के. प्रशांत मेश्राम. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील. कैलास बाकरे. दिनेश देशमुख. रवी देशमुख. सी. ए.डी. पुलगाव येथील रुपेश चापडे. यांचा समावेश होता ह्या सर्व खेळाडूंनी अतिशय उत्तम खेळून महाराष्ट्राचे व वर्धा जिल्ह्याचे नावलौकिक केले. तसेच क्रीडा क्षेत्रात या सर्व खेळाडूंचे कौतुक केले जात आहे.


