Home Breaking News क्रांतिवीर डाॅ. पांडुरंग खानखोजे यांची पुण्यतिथी साजरी.

क्रांतिवीर डाॅ. पांडुरंग खानखोजे यांची पुण्यतिथी साजरी.

0
54

मनवर शेख 

ब्यूरो चीफ़ 

हिंगणघाट.

हिंगणघाट : हिंगणघाट कारंजा चौक येथे हुतात्मा स्मारकावर झुंजण्याची प्रेरणा देणारे क्रांतिवीर डाॅ. पांडुरंग खानखोजे यांची 125 वे स्मृतीदिन मा.वासुदेवराव गौळकार माजी सभापती तथा सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट ,समाजसेवक तथा युवा बिरादरी विदर्भ अध्यक्ष श्री.अशोकराव सोरटे, समाजसेवक श्री.उल्हास राठोड, श्री. प्रदीप नागपूरकर, श्री.नांदुरकर, श्री.केशव काळे,श्री.संतोष पचोरी माजी नगरसेवक श्री.केशवराव तितरे,श्री.चेतन काळे,श्री.विजय बाकरे,प्रियाताई भोमले उपस्थित होते.मा.वासुदेवराव गौळकार यांनी क्रांतिवीर डाॅ. पांडुरंग खानखोजे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले,समाज सेवक श्री.अशोकराव सोरटे सरांनी याप्रसंगी डाॅ. खानखोजे यांच्या जीवन प्रवासाबद्दल सांगताना महान क्रांतिकारक डाॅ. खानखोजे यांचा जन्म वर्धा येथे झाला असुन स्वातंत्र्यासाठी व ब्रिटिशांची सत्ता उलटून टाकण्यासाठी शालेय जीवनापासूनच ‘ *बालसमाज* मंडळ स्थापन केले ब्रिटिशांविरुद्ध उठाव करणाऱ्या घोषणेमुळे त्यांना शाळेतून दोनदा काढण्यात आले.स्वातंत्र्यप्रती सामान्य जनात जागृती व्हावी म्हणून ‘ **राष्ट्रीय सर्कस**सुरु केली.परदेशी जावून क्रांतिकारकार्या मार्गदर्शनाचे धडे घेतले.बंगाली क्रांतिकारकांचे मदतीने क्रांतिकेंद्र स्थापन केले.1908 च्या सुमारास अमेरीकेत स्थायी झालेले सुरेंद्र बोस,अधरचंद्र लष्कर व तारकानाथ दास यांच्या सहाय्याने अमेरीकी मिलिटरी अकॅडमी प्रवेश मिळवून तोफखाना,सैन्यास उपयोगी पडणारी यंत्रे, रसायने याची माहीती घेवून अकॅडमी पदविका संपादन केली.भारतीय स्वातंत्र्याचा विचार निर्माण करण्यासाठी ‘ *इंडीया इंडडिपेंडेंट* ‘ या संस्थेच्या स्थापनेत महत्त्वाचा वाटा उचलला पुढे 1907 मध्ये ही संस्था ” *गदर पार्टी* ” या नावाने विश्वविख्यात झाली.स्वातंत्र्यासाठी इराक,इराण,जपान,जर्मनी,बदाम इत्यादी ठिकाणी भ्रमण करुन अफगाणिस्तानच्या सरहद्दीवर इंग्रज सैन्याचा पराभव केला 1119 मध्ये डाॅ. खानखोजेनी आपले नाव ‘हाजी आगाखान’ असे धारण करुन धैर्याने झुंज दिली.लोकमान्य टिळकांनी त्याना रशिया जाण्यास सांगितले परंतू खटला चालविण्याच्या भितीमुळे मागे फिरले. कॅलिफोर्निया विद्यापीठातून बी.एस.सी(कृषीशास्त्र)पदवी प्राप्त केली. शेती विषयी संशोधन करून ‘ *डाॅक्टरेट* पदवी मिळविली.रबराच्या झाडापासून

रबर’ उत्पादन,गवतापासून अन्न तयार करणे हे शोध लावले.स्वातंत्र्यासाठी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी झटणारे महान क्रांतिकारक असल्याचे प्रतिपादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here