शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटी सावलीच्या शिष्टमंडळाचे प्रशासनास निवेदन.!

0
12

 

 

शासकीय आधारभूत धान खरेदी अंतर्गत धानाचे चुकारे व अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसानाकरिता मदत मिळण्याकरिता निवेदन..!

 

सावली ( ता.प्र.) :- शासनाने शासकीय आधारभूत धान खरेदी अंतर्गत डिसेंबर २०२४ पासून विविध कार्यकारी सोसायटी मार्फत धान खरेदी सुरु केली होती, बऱ्याच शेतकर्यांनी डिसेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात आपले धान सोसायटीला दिले होते. मात्र गेल्या २ महिन्यापासून शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळालेले नाहीत त्यामुळे शेतकर्याना मोठ्या आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे.शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळालेले नसल्यामुळे धान कापणो बांधणीचे पैसे लोकांना देणे बाकी आहेत. त्याचबरोबर शेतकर्यांना धानाचे चुकारे मिळालेले नसल्यामुळे शेतकऱ्यांचा दैनदिन व्यवहारावर मोठा परिणाम झालेला आहे. शासनाने शेतकऱ्यांचे त्वरित देण्यात येतील असे सांगितले होते, मात्र दोन महिन्याचा कालावधी लोटून जात असतानाही सरकारने ठोस पाऊल उचल केल्याचे दिसून येत आहे.

 

शेतकरी शेताच्या उत्पादकतेवर उपजीविका भागवीत असतो, असे असताना सरकारने याकडे दुर्लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. करिला शासकीय आधारभूत धान खरेदी अंतर्गत शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे त्वरित देण्यात यावे व तसेच माहे जुलै २०२४ मध्ये अतिवृष्टीचा सर्वे करण्यात आलेला होता. त्यामध्ये अतिवृष्टीमध्ये अनेक लोकांच्या पिकांची नुकसान झाली होती. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या याद्या आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या मात्र KYC होऊन सुद्धा काही शेतकऱ्यांचे पैसे जमा झाले तर काही शेतकऱ्यांचे पैसे जमा झालेले नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष दिसून येत आहे.

 

याबाबत ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे पैसे जमा झालेले नाहीत अश्यांचे पैसे त्वरित जमा करण्यात यावे ह्या करिता सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळातर्फे आज तहसीलदार साहेब सावली यांच्या मार्फत संबंधित अधिकारी व प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे.

 

निवेदन देताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने,माजी जि.प.सदस्य पांडूरंग पाटील तांगडे,माजी सभापती प.स.राकेश पाटील गड्डमवार,युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर कारडे,उसेगावचे सरपंच चक्रधर दुधे,ग्राम काँग्रेस कमिटी लोंढोलीचे अध्यक्ष दिलिप पाटील लटारे,जेष्ठ पदाधिकारी प्रकाश घोटेकर,हरिदास मेश्राम, उसेगावचे उपसरपंच सुनील पाल,उत्तम जुमनाके,भारत रामटेके,जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम,उत्तम गेडाम,लीलाधर कावळे,लोमेश चौधरी,कुणाल मालवणकर,मुकुंदा ठोंबरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here