सय्यद इसा
जिल्हा प्रतिनिधी
नांदेड.
माहुर : माहुर तालुक्यातील आदिवासी व डोंगराळ भागात वसलेल्या आनमाळ येथील अंकुश दिलीपराव नरवाडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच 2023 च्या परीक्षेचा निकाल लागला त्या अधिकारी या पदावर निवड झाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मुळगावी जि.प.उ. प्राथ. शाळा आनमाळ येथे झाले, माध्यमिक शिक्षण देखील गावातील वसंतराव नाईक माध्य. विद्यालयात झाले हे विशेष. त्याच्या त्या यशाबदल गावकऱ्याकडून जल्लोष साजरा करण्यात आला.
अकुंशची आई कल्पना आणि वडील दिलीपराव नरवाडे यांची जिप्सीमधुन ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली:
गावातील सभामंडपामध्ये त्यांचा यशाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला, त्यावेळी त्या ठिकाणी गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष दोन्ही शाळेचे शिक्षक वृंद, मित्रपरीवार, पोलीस पाटील संघटनेचे संभाजी फुलारे, हेमंत पाटील, संतोष दुबे, शिवप्रसाद कदम, माणिक साळवे, राहुल वाढोरे, अविनाश नरवाडे, संदिव भवरे, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.


