भाजपा महिला मोर्चाचेवतीने मकर संक्रांती महिला मेळाव्याचे आयोजन..!         आ.समिर कुणावार, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आ. चित्राताई वाघ यांची उपस्थिती..!     महिलांनी केला आ.चित्रा वाघ यांचा हृद्य सत्कार..!

0
12

मनवर शेख 

ब्यूरो चीफ़ 

हिंगणघाट.   

 

दि.१९ : भाजपाच्या महिला मोर्चाचे वतीने आज दि.१९ रोजी मकर संक्रांति निमित्ताने महिला मेळाव्याचे स्थानिक निखाडे सभागृहात आयोजन करण्यात आले.

मेळाव्याचे प्रमुख अतिथी म्हणून विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार, तसेच भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ उपस्थित होत्या.

हिंगणघाट विधानसभा भाजपा महिला मोर्चाचे वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

सदर मेळाव्यात भाजपा महिला नेत्या तथा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आ. चित्राताई वाघ यांचा सत्कार करण्यात आला.

उपरोक्त मकर संक्रांती मेळाव्याच्या प्रमुख अतिथी म्हणून आमदार समिर कुणावार, भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा तथा विधान परिषद सदस्या चित्राताई वाघ, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, माजी जि.प.अध्यक्षा सारिका गाखरे, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा वैशाली येरावार, उपाध्यक्षा छाया सातपुते, महिला मोर्चाच्या अध्यक्षा अनिता मावळे, माजी जि.प.सदस्या शुभांगी डेहणे, माजी प.स.सभापती सुरेखा टिपले, समिक्षा मांडवकर, विजया तेलरांधे, डॉ.किर्ती दिघे, नलिनी सयाम, सुषमा सोनटक्के, डॉ. प्रणाली सायंकार, रवीला आखाडे, अर्चना झालटे, यांचेसह आ. कुणावार यांच्या सुविद्य पत्नी श्रद्धाताई कुणावार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमप्रसंगी विधानसभा क्षेत्रातील भाजपा महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी तसेच महिला कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया सातपुते यांनी केले. प्रस्ताविक अर्चना वानखेडे तर महिला मोर्चाच्या अध्यक्षा अनिता मावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here