Home Breaking News क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी..!

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी..!

0
11

चंद्रकांत सु. गायकवाड 

जिल्हा प्रतिनिधी 

सोलापूर.

मोजे *पिसेवाडी* येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या *१९९* व्या जयंतीनिमित्त अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य *मा. श्री. अर्जुनसिंह मोहिते पाटील* यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करूण विनम्र अभिवादन करण्यात आले

या जयंतीनिमित्त आयोजकांच्या वतीने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. समाजासाठी प्रेरणादायी पाऊल उचलत अर्जुनदादांनी स्वतः रक्तदान केले

यावेळी (आरपीआय तालुका अध्यक्ष)मिलिंद सरतापे शिवामृय संचालक सुरेश पिसे भागवत पिसे,मा. सरपंच व क्रांतीसुर्य प्रतिष्ठान अध्यक्ष अण्णासाहेब शेंडे, उपसरपंच भाऊसाहेब पिसे, रामभाऊ पिसे, सहील अत्तार, ज्ञानेश्वर बोराटे, ज्ञानेश्वर पिसे, दीपक पिसे, प्रकाश पवार, गणेश पिसे, अमोल राऊत, रामचंद्र पिसे तसेच क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे सदस्य, समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँक, अकलूज येथील सर्व कर्मचारी वर्गाचीही उपस्थिती लाभली.

समाजहितासाठी कार्यरत राहण्याचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here