Home Breaking News चिंचाळा प्रादेशिक पाणीपुरवठा नियमित सुरु करण्यासाठी मुख्य कार्यकरी अधिकारी यांना निवेदन सादर..!

चिंचाळा प्रादेशिक पाणीपुरवठा नियमित सुरु करण्यासाठी मुख्य कार्यकरी अधिकारी यांना निवेदन सादर..!

0
31

चंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यातील चिंचाळा प्रादेशिक पाणीपुरवठा नियमित सुरु करण्यात यावी योजनेचे प्रलंबित वीज- देयकाचा त्वरित भरणा करून सात गावांची ही नळ योजना सुरळीत सुरु करावी यासाठी शिखर समितीच्या वतीने दिनांक ०४ मार्च २०२६ रोजी जि.प.चे मुख्य कार्यकरी अधिकारी पुलकित सिंह यांना निवेदन सादर करण्यात आले.

 

मुख्य कार्यकरी अधिकारी यांना भेटलेल्या शिष्टमंडळात भाजपा तालुकाध्यक्ष विनोद खेवले, शिखर समितीचे अध्यक्ष प्रकाश शेंडे, भारत रोहने, प्रकाश अल्वलवार यांची उपस्थिती होती. सदर प्रादेशिक नळ योजनेमध्ये चिंचाळा, नागाळा, महाकुर्ला, वांढरी, धानोरा, सिदूर व वेंडली या गावांचा समावेश असून सुमारे रू. 33 लक्ष वीजबिल भरणा न केल्याने दि. २० फेब्रुवारी २०२६ पासून वीज खंडित केल्यामुळे या सर्व गावांना पेयजलाचा फटका बसला असून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लोकांना पाणी टंचाई सारख्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने या ज्वलंत समस्येची दखल घेऊन वीजबिलाचा भरणा त्वरित करून या सात गावातील नागरिकांना दिलासा द्यावा व ही पाणी पुरवठा योजना पूर्ववत सुरु करावी या आशयाचे निवेदन देण्यात आले.

या शिष्टमंडळास मुख्य कार्यकरी अधिकारी यांनी सदर समस्या तातडीने सोडविली जाईल असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here