Home Breaking News आषाढी एकादशी निमित्त दिंडी निघाली संस्कार ज्ञानपीठ स्कूल समुद्रपुर..!

आषाढी एकादशी निमित्त दिंडी निघाली संस्कार ज्ञानपीठ स्कूल समुद्रपुर..!

0
83

गिरड विशेष प्रतिनिधी

प्रमोद झिबड 

समुद्रपुर

दिनांक ५ जुलै २०२५ वर्धा जिल्ह्यातील संस्कार ज्ञानपीठ समुद्रपूर येथील नर्सरी के .जी. 1 के. जी 2 तसेच वर्ग 1 ते वर्ग 9 वी. च्या सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा कायम ठेवून दिंडी सोहळ्याचे आयोजन केलेले होते.या दिंडीमध्ये सर्व विद्यार्थी विठ्ठलाच्या भजनावर व अभंगावर ताल धरून हरिपाठ तसेच फुगडी, ज्ञानोबा माऊली तुकाराम पाऊली टाकत दिंडी सोहळ्याचा आनंद घेतला पालखीमध्ये ‘ ग्राम गीता ‘ व ‘ज्ञानेश्वरी ‘ हे ग्रंथ ठेवण्यात आलेले असून ति दिंडी समुद्रपूर नगरी मध्ये फिरवण्यात आली या दिंडीचे आयोजन संस्कार ज्ञानपीठ शाळेतील “डे सेलिब्रेशन कमिटी ” शिक्षक वर्णा वांडरे,वृंदा राऊत, संध्या दांडेकर ,प्रणिता जिपकाटे, गायत्री दिवे,ठाकरे मॅम ,यांनी केले असून अभिषेक बैलमारे, आचल गलांडे ,भारती सावरकर ,ममता डोंगरे, घुमडे मॅम, झाडे मॅम , आचल मांडवकर, अमोल जिल्हारे सर,अमोल डोंगरे सर ,वृषभ लोनबले,जीवन वाघ, राकेश गेडाम,सतीश गारघाटे ,प्रणाली देशमुख, राधिका मॅम ,अशोक बोरकुटे रवींद्र बूटे, जिवतोडे सर, क्रिष्णा धुळे सर ,या सर्वांनी सहकार्य केलेले होते.शाळेचे संचालक श्री.आकाश जी जयस्वाल सर ,व शाळेचे प्राचार्य श्री.विजय राऊत सर,दिंडी सोहळातील सहभागी सर्व शिक्षक वृद व समुद्रपुर नागरिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. देवशयनी आषाढी एकादशी पासन सन काळ हा चतुर्मास (चार महिने) म्हणून ओळखला जातो आणि हा पावसाळ्यासोबतच असतो.दिनांक ०६ जुलै २०२५ ला देवशयनी आषाढी एकादशी आहे. काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यत: विठ्ठलाची पूजा करतात.देवशयनी आषाढी एकादशी म्हणजे चातुर्मासाची सुरुवात असते. या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केले जातात पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी लाखों वारकरी दाखल झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे.

आषाढी वारीसाठी वारकरी मोठ्या उत्साहाने पंढरपूरकडे निघाले आहेत. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ‘जय हरी विठ्ठल’च्या जयघोषात वातावरण भक्तीमय झाले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here