गिरड विशेष प्रतिनिधी
प्रमोद झिबड
समुद्रपुर
![]()
दिनांक ३ जुलै २०२५ वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात वायगाव (हळद्या) येथील मोहरमची सातवी तारीख साजरी करण्यात आली. सायकाळी १० वाजे पासून गावातील प्रत्येक भकत्तांच्या घरी बाबांची भेटीला जाऊन सवारी सोबत बँड ,संदल वाजत सर्व भक्तगण शेख फरीद बाबा , चांद खॉन दर्ग्यावर नमाज पडाला गेले. बनवलेल्या हवाल्यात
लाकडाला अग्नी पेटवून खवखव्या अग्नी मध्ये भगत सावरी सोबत नाचतात. ते बघण्या करीता बाहेर गावावरून भाविक मंडळी वायगाव ला येतात पब्लिक संरक्षणा करिता समुद्रपुर पोलिस स्टेशनचे अमनदार विकी मस्के, मेजर रामदास चकोले, सत्यजित इंगळे, संदीप उईके,आशिष मेश्राम, कपिल मेश्राम,सैनिक आकाश झिबड, मुकेश बावणे,अजय गिरडे, अन्य तसेच वायगांव ह. (पोलीस पाटील) आशिष पाटील यांच्या उपस्थित बंदोबस्त करण्यात आला. वायगाव मध्ये मोहरमची परंपरा आजही कायम आहे.
पूर्वीपासून चालत आलेला मोहरम गावातील सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन हा मोहरमचा उत्सव साजरा करतात. सर्व गावातील गावकरी शांततेने व सुवस्तेत हा उत्सव साजरा पार पडतात.


