गिरड विशेष प्रतिनिधी
प्रमोद झिबड
समुद्रपुर
समुद्रपूर / मांडगाव दि.१२: थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त समुद्रपुर येथील ऋषी भागिरथ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत त्याची जयंती व समतापर्व अंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री दिगंबर पुंड याच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
![]()
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) हिंगणघाट तालुका समतादूत ज्योशना जांभुळकर, समुद्रपुर तालुका समतादूत ज्ञानेश्वर बडोले, संस्थेचे प्रभारी प्राचार्य श्री प्रणव हळदे , गट निदेशक सौ माधुरी बालपांडे,शिल्प निदेशक सौ . अभया मंधाळे, शिल्प निदेशक श्री सतीश वरके, शिल्प निदेशक श्री रुपराव ठाकरे ., शिल्प निदेशक श्री अश्विन्द्र नगराळे, शिल्प निदेशक श्री नितीन वरघने, शिल्प निदेशक श्री प्रतीक ठाकरे वरिष्ठलिपिक सौ रिता भुसारी, भंडारप्रमुख. श्री शंकर पिचके, चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री अंकित भगत, सौ. मयुरी दुधे, सौ.करुणा रामटेके, श्री यशवंत मडावी यांच्यासह कर्मचारी व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘समता पर्व’ (बार्टी) अंतर्गत विशेष व्याख्यानात प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनात महात्मा फुले यांचे शिक्षण, स्त्री-शिक्षणावरील विचार, अस्पृश्यता विरोधी कार्य, सत्यशोधक समाजाची स्थापना आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी केलेले कार्य यावर सखोल भाष्य केले. तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य पुंड यांनी महात्मा फुले यांच्या विचारांची आजच्या समाजात आवश्यकता काय आहे, यावर प्रकाश टाकला. त्यांनी महात्मा फुले यांचे सामाजिक विषमते विरुद्धचे कार्य, स्त्रियांचे शिक्षण, वंचित वर्गांसाठी त्यांनी घेतलेले उपक्रम हे आजच्या काळातही मार्गदर्शक आहेत असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन शिल्प निदेशक श्री विवेक दुधे यांनी केले. तर आभार प्रदर्शन शिल्प निदेशक श्री शुभम बालपांडे यांनी करून सर्व उपस्थितांचे, विशेषतः प्रमुख पाहुण्यांचे मनःपूर्वक आभार मानले हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला. महात्मा फुले यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न संस्थेमार्फत यशस्वीपणे पार पडला.


