Home Breaking News पोहरागड येथे भरला भाविकांचा मेळा.सुनिल चव्हाण यांच्या गीताने गाजला तो सोहळा..!

पोहरागड येथे भरला भाविकांचा मेळा.सुनिल चव्हाण यांच्या गीताने गाजला तो सोहळा..!

0
74

सय्यद इसा 

जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड.

 

रामनवमीच्या पावन पर्वावर बंजारा समाजातील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे देशभरातून लाखोच्या संख्येने भक्त जणांनी श्री संत सेवालाल महाराज यांच्या दर्शनासाठी हजेरी लावली.या सोहळ्या निमित्त भक्ती धाम येथे बंजारा सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते राजस्थान.गुजरात.तेलंगणा आंध्रप्रदेश.कर्नाटक.महाराष्ट्र . विविध राज्यातील कलावंतांनी आप आपली कला सादर केली.जिव्हाळा कला संच चे प्रसिद्ध गायक सुनिल रामचंद्र चव्हाण रा.माळेगांव तह.आर्णी जी.यवतमाळ यांनी सुध्धा स्त्री व पुरुष च्या आवाजात गीते सादर करून ती मैफिल टाळ्यांच्या कडकडाटात गाजवून सोडली .

भक्ती धाम चे निर्माते आणि राष्ट्रीय बंजारा परिषद चे संस्थापक अध्यक्ष श्री किसनभाऊ राठोड यांनी सुनिल चव्हाण यांची प्रशंसा करून शाल श्रीफळ व मोत्याची माळ देवून सन्मानित केले.या वेळी पुणे जिल्हा राष्ट्रीय बंजारा परिषद चे अध्यक्ष श्री नाना राठोड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन महंत जितेंद्र महाराज यांनी केले होते

हजारोच्या संख्येने समाज बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here