Home Breaking News आदर्श ने आदर्श ठेवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे नाव लौकिक केले.!

आदर्श ने आदर्श ठेवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे नाव लौकिक केले.!

0
73

मनवर शेख 

ब्युरो चीफ 

हिंगणघाट.

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एदलाबाद येथे आदर्श (किशोर शेंडे) ने आदर्श ठेवून नवोदय परीक्षेत सूयश प्राप्त केल्याबद्दल त्याचा सत्कार.

समुद्रपुर.: समुद्रपूर तालुक्यातील केंद्रप्रमुख अशोक आडे सर यांच्याच केंद्रातील पाच विद्यार्थी नवोदय व एक विद्यार्थी एकलव्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थ मंडळी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्यावतीने त्याचा सत्कार करण्यात आला.

यावेळी केंद्रप्रमुख अशोक आडे सर, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर उराडे सर, सहशिक्षक चंद्रकांत उमाटे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामेश्वर अंबाडरे, विकास विद्यालयचे क्रीडा शिक्षक राजु कांबळे सर, अंकुश पाटील सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका
मायाताई चाफले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तावी चे मुख्याध्यापक मुंडे, अरुण रावजी , माजी पंचायत समिती सदस्य इस्राईल शेख, पोलीस पाटील सागर वाघाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य शुभांगी ताई काटेखाये या सर्वांनीआभार मानले.

तसेच आदर्श शेंडे यांचे वडील किशोर शेंडे व जया शेंडेआई यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सर्व पालक वर्ग व विद्यार्थी व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आदर्श या विद्यार्थ्याला भावी शैक्षणिक वाटचाली करिता सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here