Home Breaking News सुनिल चव्हाण यांच्या गिताने बहरला तो क्षण.!

सुनिल चव्हाण यांच्या गिताने बहरला तो क्षण.!

0
55

सय्यद ईसा 

जिला प्रतिनिधि 

नांदेड.

यवतमाळ येथील नामवंत डॉ.निशांत चव्हाण यांचे वडील श्री. टि.एस.चव्हाण माजी मुख्याध्यापक यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस शिव आश्रम स्वरा फॉर्म हाऊस भारी यवतमाळ येथे डॉ.निशांत चव्हाण सौ.शीतल नि.चव्हाण डॉ. षडज चव्हाण सौ. स्मूर्ती ष.चव्हाण यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.श्री. टि.एस.चव्हाण

सरांची जीवन गाथा. संघर्षमय कहाणी सरांचे माजी विद्यार्थी श्री.विष्णू आडे सर श्री.ओमप्रकाश पवार सर.श्री.विठ्ठल राठोड सर प्रा.अर्चना चव्हाण यांनी अतिशय भावनिक अशा शैलीत कथन केली. या सोहळ्यात सिनेकलावंत श्री.सुनिल रामचंद्र चव्हाण रा.माळेगांव तह.आर्णी जी.यवतमाळ यांनी स्त्री व पुरूष च्या आवाजात गीत गाऊन श्रोते मंडळींना आश्चर्य चकित केले आणि तो क्षण बहरून गेला.चव्हाण परिवाराच्या वतीने श्री. टि.एस.चव्हाण सरांच्या हस्ते सुनिल चव्हाण यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.सूत्र संचालन खुशबू भालेराव हिनी केले .आजचा हा बाबांचा वाढदिवस एक प्रेरणा देणारा दिवस म्हणून साजरा करीत असून आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचे सौ. स्मुर्ति चव्हाण यांनी अभिनंदन करून आभार मानले।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here