सय्यद ईसा
जिल्हा प्रतिनिधि
नांदेड़.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा महीला शाखा नांदेड च्या वतीने आणि तालुका शाखा माहूर सहकार्याने माहूर येथील नूतन समाज भवन येथे दि.16/03/2025 रोजी उपासक /उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन संपन्न झाले असुन या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयुनि. संध्याताई कांबळे केंद्रीय शिक्षिका नवी मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
![]()
दि.16/3/2025 रोजी सायंकाळी 8 ते 10 या वेळेत या शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले असुन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. संतोष डोंगरे लिंबायत ता.माहूर हे होते.प्रास्ताविक प्रा.विनोद कांबळे माजी तालुका अध्यक्ष माहूर यांनी केले.या कार्यक्रमाचे उदघाट्न आयु.संजय कांबळे सचिव जिल्हा शाखा यवतमाळ यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून शिबिराचे उद्घाटन झाले असे जाहीर करुन मार्गदर्शन केले. यावेळी आद.शांतिदूत मुळे सचिव प्रचार व पर्यटन जिल्हा शाखा यवतमाळ, आद.प्रा. राजेंद्र लोणे माजी अध्यक्ष माहूर तालुका शाखा यांनी उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीराच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. मंचावर उपस्थिती मध्ये पू.आर्या खेमा यांनी पंचशीला दिली. आयुनी.नंदाताई कांबळे नगरसेविका माहूर,आयुनी.सुरेखाताई तळणकर जेष्ठ पत्रकार माहूर, आद. श्रीरंग जगताप सर या कार्यक्रमाचे सुत्र संचलन आद.विजय भगत उपाध्यक्ष माहूर तालुका शाखा यांनी केले तसेच आभार प्रदर्शन आयु. प्रा. विनोद कांबळे यांनी केले.
या शिबिरा मध्ये त्रिसरण पंचशील अर्थासह , तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवन चरीत्र , बौद्धांचे सण व मंगल दिनी , बावीस धम्म प्रतिज्ञा , सिगाल सुत्त , पुजा साहित्याचे महत्व , अंधश्रद्धा एक सामाजिक समस्या , भारतीय बौद्ध महासभा आणि तीचे कार्य इत्यादी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल,
या धम्म प्रशिक्षण शिबीराचा समारोपीय कार्यक्रम दि.25/3/2025ला संपन्न होणार आहे.यावेळी सर्व शिबिरार्थींना प्रमाणपत्राचे वितरीत करण्यात येईल.अशा प्रकारे असंख्य धम्म प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यासाठी समाज बांधवांनी सहकार्य करावे असे नांदेड जिल्हा महिला शाखेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
नमोबुध्दाय…!! जयभिम…!!!
आपली धम्मभगीनी -अनिताताई खंडारे अध्यक्षा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा महीला विभाग जिल्हा शाखा नांदेड.


