मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट.
वडणेर येथील श्री साईबाबा लोक प्रबोधन कला, विज्ञान व तंत्रज्ञान महाविद्यालयात २५ गुणवंत विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पाल्यांचा सत्कार – सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा. दिवाकर गमे, मुख्य अतिथि संस्था – सहसचिव अविनाश गमे, जेष्ठ पत्रकार विजय राठी, संस्था-संचालक भास्कर राऊत, मविस सदस्य प्रदीप महल्ले, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. सारिका चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
उच्च शिक्षणाच्या महत्त्वावर उचित भर दिल्यास जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी स्वत: मध्ये परिपक्वता निर्माण होते, त्यासाठी अध्ययन – अध्यापनाच्या गतीला योग्य दिशा देण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक एकाच छताखाली एकत्र काम करणं आवश्यक आहे त्यातून विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावून कलागुणांना योग्य दिशेने वाव मिळेल, असा विश्वास अध्यक्षीय भाषणात प्रा. दिवाकर गमे यांनी व्यक्त केला.
महाविद्यालयाची यशस्वी गाथा आणि भविष्यातील वाटचाल यावर प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. सारिका चौधरी म्हणाल्या, विद्यार्थी दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवतात, ऑनलाइन शिक्षणासाठी 2000 विडियो, समृध्द ग्रंथालय, संगणक लॅब, मोफत इंटरनेट व तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांनी विद्यापीठस्तरावर खो – खो, हॉलिबॉल, ज्युडो याखेळात 23 विद्यार्थ्यांनी विविध राज्यात विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. कॉनफरन्स व सेमिनारमधून पाच जर्नल प्रकाशित केले असून अशा विविध उपक्रमातून विद्यार्थी शिक्षक, पोलिस, सैनिक, रेल्वे कर्मचारी, लिपिक, छोटे – मोठे व्यावसायिक, उद्योजक, समाजसेवक व देशाचा सुजाण नागरिक घडविण्याचा व राष्ट्रहित साधून राष्ट्रनिर्माण करण्याचा आमचा मानस आहे असे उद्देशपूर्ती विवेचन केले.
प्राविण्य प्राप्त गुणवंतांमध्ये कॉलेजच्या प्रथम महिला प्राचार्य डॉ. सारिका चौधरी, राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट स्वयंसेवक – अभय पोहाणे,. संस्कृती भांबेवार, भावना मडावी, तेजस्विनी बावणे, मतदार दिनी रांगोळी व पोस्टर स्पर्धा -. राधिका गोटेफोडे, रितू गोंदुडे, राधिका शिदे, रश्मी उमाटे, सावित्रीबाई फुले वेशभूषा स्पर्धा – लक्ष्मी नांदेकर, प्रश्नमंजुषा स्पर्धा – तनु मूंजेवार, आदर्श माजी विद्यार्थी – योगेश पोहाणे, राहुल दुरतकर उत्कृष्ट पालक – गजाजन सेलवटकर, उत्कृष्ट शेतकरी – अंबादास हाते, पीएच. डी प्राप्त – डॉ. पंकज मून, डॉ. नितेश तेलहांडे, डॉ. संजय दिवेकर, पेटेंट व उत्कृष्ठ संशोधन निबंध प्राप्त – डॉ. विठ्ठल घिनमिने, नागपूर विद्यापीठ राज्यशास्त्र प्राधिकरणावर डॉ. विनोद मुडे यांची सदस्यपदी निवड, सेट – नेट परिक्षा उत्तीर्ण विशाल नरेश कातडे, बी. फॉर्म शिक्षण व नौकरीसाठी अनिकेत शंकर कापसे इत्यादींचा समावेश होता.
यावेळी प्रा. डॉ. विनोद मुडे लिखित “महाराष्ट्र की राजनीति” पुस्तकाचे प्रकाशन व “भारतीय संविधान आणि नवीन शैक्षणिक धोरण” संपादित डॉ. पंकज मून व डॉ. संजय दिवेकर यांच्या चॅप्टर बूक चे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. विनोद मुडे / प्रा. आरती देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. पंकज मून यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. नरेश भोयर, डॉ. गणेश बहादे, डॉ. प्रवीण कारंजकर, नरेश कातडे, शंकर कापसे, संजय पर्बत, कु. प्रिती सायंकार, अंकुश वैद्य, अरुण तिमांडे, विजयालक्ष्मी जारोंडे यांनी अथक परिश्रम घेतले.