ऊबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख मा.ज्योतिबादादा खराटे यांचे संकल्पनेतून..! भव्य मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.!

0
6

सय्यद इसा 

जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड.

श्रीक्षेत्र माहूर : – उबाठा शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख लोकनेते ज्योतिबा दादा खराटे यांच्या संकल्पनेतून भव्य मोफत नेत्र तपासणी मोती बिंदू शस्त्रक्रिया आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन युवासेना जिल्हा प्रमुख यशभाऊ खराटे यांच्या हस्ते दि 10 /3/ 2025 रोजी जुन्या नगरपंचायत इमारतिच्या प्रांगणात करण्यात आले

यावेळी प्रमुख उपस्थितीत तालुका प्रमुख उमेश जाधव, उपनगराध्यक्ष नाना लाड, रविंद्र बेहेरे पाटील, शहर प्रमुख निरधारी जाधव, शेतकरी से.ता.प्रमुख अशोक उप्पलवाड, युवा जिल्हा समन्वयक अक्षय सातव, गटनेत्या सौ.आशा जाधव, मा.गटनेते/शहर समन्वयक बालाजी वाघमारे, युवतीसेना तालुका प्रमुख सौ.सुरेखा तळणकर, युवासेना जिल्हा उपप्रमुख, जितु चोले युवासेना विधानसभा प्रमुख खुशाल तामखाने, युवासेना तालुका प्रमुख अक्षय वाघ, शहर प्रमुख संदिप गोरडे, सो.मि.वि.स.प्रमुख गजानन चव्हाण, यु.श.उपप्रमुख कनिष्ठ वानखेडे, शिवसैनिक सोनु तेल्हारे, रमेश कुरसंगे यांचे सह मान्यवर उपस्थित होते

उबाठा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि लोकनेते जोतिबा दादा खराटे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या शिबिरात वानोळा येथे शिबिर संपन्न झाले येथे 164 रुग्णांनी लाभ घेतला तर माहूर येथे झालेल्या शिबिरात 274 रुग्णांनी सहभाग घेतला तर दि 11 रोजी वाईबाजार येथे आयोजन करण्यात आले असून दिनांक 12 रोजी मांडवी तसेच किनवट तालुक्यात दि १९ पर्यंत हे शिबिर सुरू राहणार असल्याने गरजूंनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन लोकनेते ज्योतिबा दादा खराटे युवा नेते यश खराटे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here