मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट.
हिंगणघाट : दिनांक 8 मार्च 2025 वडणेर येथील श्री साईबाबा लोक प्रबोधन कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात ‘महिला सन्मान तक्रार निवारण समिती आणि कार्यस्थळी महिला लैंगिक अत्याचार प्रतिबंधक समिती’ यांच्या वतीने ‘जागतिक महिला दिन’ निमित्य ‘स्त्री सुरक्षेवर विशेष मार्गदर्शन’ कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सारिका चौधरी, मार्गदर्शक सौ. निता पांगुळ, डायरेक्टर, आशा बहुउद्देशीय शिक्षण संस्था वर्धा, प्रमुख अतिथि डॉ. विनोद मुडे, युवा खासदार हर्ष उबाळे, करूणा दाभणे अध्यक्ष – करुणा बहुउद्देशीय विकास संस्था, डॉ. विठ्ठल घिनमिने, समन्वयक प्रा. आरती देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
महिला दिनाचे महत्त्व, स्त्री सक्षमीकरण, शिक्षण, स्वावलंबन आणि महिला सुरक्षेचे उपाय या विषयांवर विचारमंथन करण्यात आले. मार्गदर्शक नीता पांगुळ यांनी स्त्रीशक्ती ही समाज परिवर्तनाची खरा गाभा असल्याचे स्पष्ट करत, यशस्वी करिअरसाठी शिक्षण आणि सुरक्षिततेच्या जाणिवेचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगितले. प्राचार्य डॉ. सारिका चौधरी यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले की, “स्त्री शक्ती ही केवळ कर्तृत्वाची ओळख नसून सृजनशीलतेचा एक अमूल्य ठेवा आहे,” यामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास आणि स्त्री शक्तीची जाणीव निर्माण करण्याची गरज आहे.
डॉ. विनोद मुडे, हर्ष उबाळे, करूणा दाभणे यांच्या यथोचित मार्गदर्शनातून विद्यार्थिनींनी महिलांचे हक्क, सशक्तीकरण आणि सुरक्षितता या सुरक्षा विषयक माहिती मधून विद्यार्थिनींमध्ये स्त्री सुरक्षेबाबत अधिक जागरूकता निर्माण झाली. यावेळी डॉ. विठ्ठल घिनमीने यांनी “नारीशक्ती म्हणजे क्रांतीची ज्योत, ती एक तेजस्वी रोषणाई!” या कवितेतून स्फूर्ती दिली. सूत्रसंचालन प्रा. आरती देशमुख गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्रास्ताविक डॉ. नितेश तेलहांडे तर डॉ. संजय दिवेकर यांनी आभार मानले. डॉ. प्रवीण कारंजकर डॉ. गणेश बहादे, डॉ. नरेश भोयर, प्रीती सायंकार, विजयालक्ष्मी जारोंडे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.