चंद्रपूर महानगरपालिका झोन क्रमांक तीन बंगाली कॅम्प श्याम नगर वार्डातील मेन रस्ता मागील दहा वर्षापासून खराब झालेला आहे रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून वार्डातील नागरिकांना रस्त्यावरून वाहतूक व पायदळ चालताना खूप त्रास सहन करावा लागतो आहे रस्त्यावर जागोजागी खड्डे असल्यामुळे शाळेकरी विद्यार्थ्यांना व सामान्य नागरिकांना रस्त्यावरून जाणे येणे कठीण झालेल्या आहे रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होत असल्यामुळे चंद्रपूर शहर महानगरपालिका श्याम नगर , वार्डातील मेन रस्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते भगतसिंग चौका समोरील स्वस्त धान्य दुकान पर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करून पक्के रस्ते बनवण्यात यावे तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यकरण करण्यात यावे व श्याम नगर वार्डातील नागरिकांना पंतप्रधान अमृत नळ पाणीपुरवठा योजना द्वारे पाणी नियमित सुरू करण्यात यावे आणि श्याम नगर वार्डातील अमृत नळ पाणीपुरवठा योजना मुळे खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावे अशी मागणी करिता मा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार व माननीय आयुक्त साहेब चंद्रपूर शहर महानगरपालिका पालिका यांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष मा.काशिनाथ बोरकर माननीय राघोबा आलाम सर एडवोकेट अजित भडके साहेब मा. अमोल कुरेकार मा. प्रवीण बोधे सर मा. प्रवीण नेल्लोरी मा. राष्ट्रपाल बुटले यांच्या उपस्थितीत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आले.