प्रमोद झिबड
विशेष प्रतिनिधी
गीरड.
श्री हनुमान संत गजानन महाराज व दुर्गा माता देवस्थान,समुद्रपूर र. नं.ऐ / ५६५ वर्धा.आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी ( मेघे) व शरदपवार दंत महाविद्यालय व रुग्णालय सावंगी (मेघे) पी.व्ही.टेक्सटाईल जाम व कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सवा निमित्त भव्य मोफत सर्व रोग निदान व उपचार व शिबिर.!
दि.१९/ ०२/२०२५ रोज बुधवार, वेळ.सकाळी.११ते ३ वाजेपर्यंत.स्थळ: देवस्थानचे सभागृह,आठवडी बाजार,समुद्रपूर शिबिरा मध्ये खालील आजारांची तपासणी व उपचार केल्या जाईल.तज्ञ डॉक्टराकडून सर्व रोग तपासणी व उपचार इत्यादी.नेत्ररोग तज्ञ डॉक्टरांकडून डोळ्याचे सर्व आजार,मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केल्या जाईल. अस्थिरोग तज्ञ डॉक्टरांकडून संधिवात मणक्यात असणारी गॅप वाकलेले पाय इत्यादी आजाराची तपासणी केल्या जाईल. स्त्रीरोग तज्ञ डॉक्टराकडून महिलांचे विविध आजाराची तपासणी केल्या जाईल.
वातविकार तपासणी व उपचार.
दंत महाविद्यालय विभाग.दात साफ करणे.दात काढणे इत्यादी. रुग्णांचा आजार महात्मा फुले आरोग्य योजनेत न आल्यास रुग्णाला औषधीचा व इम्प्लांट चा खर्च स्वतः करावा लागेल.भरती काळात रुग्णाला रक्ताची गरज पडल्यास व्यवस्था स्वतः करावी लागेल.
गुडधा व कंबरेच्या सांध्याचे प्रत्र्यारोपन महात्मा ज्योतिबा फुले योजनेत आल्यास मोफत केल्या जाईल.
शिबिरांचे वैशिष्ट्ये :-शिबिर स्थळावर नोंदणी मोफत.तज्ञ डॉक्टराकडून तपासणी मोफत.
भरती रुग्णांना सर्व चाचण्या उदा.(एक्स-रे ,रक्त,लघवी चाचणी, सोनोग्राफी मोफत)
अतिविशिष्ट चाचण्या (सी. टी.स्कॅन,एम.आर. आय इत्यादी चाचण्या आवश्यकते नुसार व डॉक्टरांच्या सल्यानुसार ५०% सवलतीच्या दरात.
रुग्णाचा आजार महात्मा फुले जन आरोग्य योजनते आल्यास उपचार.
सूचना :- भरती रुग्णांना दवाखान्यात जाण्याकरिता वाहनाची व्यवस्था मोफत राहील.
शिबिरामध्ये येतांना रुग्णांनी आधार कार्ड सोबत आणावे.
टीप: शिबिरामध्ये आरोग्य विमा कार्ड चार व्यक्ती करीता रुपये ३००/- काढण्यात येईल.
६० वर्षावरील व्यक्ती ला रू. १००/- मध्ये कार्ड काढता येईल.
विनीत:- देवस्थान कमिटी, समुद्रपूर,संपर्क:
मो.9011513434,8830928470,9021112903.