मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट.
दि.28 जाने:- ला आयुष्यमान आरोग्य मंदिर धोंडगाव अंतर्गत जिल्हा परिषद शाळा व धोंडगाव व सरस्वती विद्यालय धोंडगाव येथे एक दिवशी सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला त्यामध्ये विविध प्रकारचे योगासने प्राणायाम सूर्यनमस्कार घेण्यात आले तसेच किशोरवयीन मुलांसाठी योग संस्कार सुदृढ आरोग्यासाठी योग मासिक तणाव नियंत्रणासाठी योग याबद्दल सर्वांना माहिती सांगण्यात आली मार्गदर्शक सौ प्रियाताई बाभुळकर कोषाध्यक्ष महिला पतंजली योग समिती वर्धा, सौ सुनंदाताई बुरटकर संवाद प्रभारी, सौ वंदनाताई महाकाळकर योगशिक्षिका कृतिका महाकाळकर उपस्थित कर्मचारी कुमारी शितल खातदेव समुदाय आरोग्य अधिकारी सौ दुर्गावटे आशा धोंडगाव अशा पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.