पी.एम.श्री.समुद्रपूर शाळेत “कलामहोत्सव व बक्षीस वितरण समारंभ..! 16 विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ आर्ट अवॉर्ड तर थुल यांचा उत्कृष्ठ गुरुवर्य अवॉर्ड.!

0
21

मनवर शेख

ब्युरो चीफ

आवाज 24 न्यूज  

हिंगणघाट.

पी.एम.श्री.शाळा,समुद्रपूर चा उपक्रम 140 विद्यार्थ्यांचे सादरीकरण..!

समुद्रपूर :- स्थानिक पी. एम. श्री. जिल्हा परिषद उच्चं प्राथमिक केंद्र शाळा समुद्रपूर येथे केंद्रसरकार अनुदानित योजनेतून शाळा व शिक्षक व विद्यार्थी यांचं नातं घट्ट व्हावं, शिक्षणाला कृतीची जोड मिळावी, या दृष्टिकोनातून शाळेत कला महोत्सव व विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यामध्ये विविध कला गुण असतात. त्या गुणांना संधी देऊन विकास करण्याचा व छंद जोपासण्याचा प्रयत्न करावा. यामुळे विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास वाढतो. क्षमताचा विकास होतो.समाज पालक शाळा यांचं नातं दृढ होत. तानतनावाचे समायोजन होऊन पुढील कार्याला दिशा मिळते. सांस्कृतीक कार्यक्रमात 140 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ठ कलाकृतीचे सादरीकरण केले.

यावेळी बुध्द चरणी ग.भीम धरणी ग..दिल है छोटासा,आ. हा.. टमाटर,आई तुझं देऊळ,मराठा सैन्य,स्कूल चले हम,सोशियल मिडिया ड्रामा,माझ्या डोळयात काजळ,ताल्या बाईज डान्स,छोटा बच्चा,बम बम बोले.,कष्टाचे कळ (नाट्यछटा).काली बिंदी मराठी रिमीक्स, सेल्फी (नाट्यछटा),गल्ला गुडीया,कोळी डान्स उधळ हो,स्वच्छता और पाणी,लेझीम डान्स, रिमिक्स सांग डान्स बनठण, नाट्यछटय – छवी वाहामार – काय सांगर तुमने,मारी डान्स, राजा तू, रिमिक्स (एकल नृत्य) आस्था,हळदी कुंकु नाटक,देशभक्ती रिमिक्स,भिम तारा,लेझी डान्स,आपलीय हवा,तलवारी चे रिमीक्स डॉन्स,होती है फिलींग्स,कुच्ची यम्मा बेटी पाटलांचा बैलगाढा रिमिक्स डॉन्स,काळी बिंदी रिमिक्स डॉन्स सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकातून नरेश वाघ सहाय्यक शिक्षक यांनी शाळेच्या बाबत माहिती दिली. शाळेत ए. पी. जे. अब्दुल कलाम इंनोवेशन केंद्र, नावीन्यपूर्ण प्रयोगशाळा, 2500 पुस्तकांचे वाचनालय, इनडोअर व इऊटडोअर, स्केटिंग, कॅरोम, हॉलिबॉल, फूटबॉल, बॅट बिन्टन अशा विविध खेळाचे साहित्य उपलब्धता, CCTT कॅमेरा, रंगमंच, सुंदर गार्डन, परसबाग, पाणी शुद्धीकरण,जिम साहित्य, ट्रॅपोलीन असे विविध साहित्य असल्याची माहिती दिली तसेच कला महोत्सवाचा उद्देश व प्रयोजन विषद केले.
प्रमुख अतिथी प्रशांत जाधव प्रशासन अधिकारी यांनी कला महोत्सवामुळे मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळते तसेच अभिव्यक्ती प्रदर्शित करता येते असे मत व्यक्त केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्य आयोजित चित्र रंगवा स्पर्धेत 134 मुलांनी सहभाग घेतला यात छवी योगेश भोयर, देवश्री उमेश नेताम,सार्थक वैद्य,देवांशु ढाले,अनुज मेश्राम, आर्या घ्यारे, रागिनी टेंभरे,स्वरा झाडे,अपेक्षा ताजने, मिहीर निमसडे, मंथन आकाश वाघमारे,अनुप आकाश सोनकुनसरे, प्रियल मेश्राम,मानवी निखाडे,कृतिका गजानन मुडे,अक्षरा निलेश नागपुरे या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

शाळेतील प्रवीण थुल सहाय्यक अध्यापक यांना सन 2024-25 करिता बालरक्षक प्रतिष्ठान च्या सौजन्याने उत्कृष्ठ शिक्षक म्हणून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पी. एम. गायकवाड मुख्याध्यापक होते. प्रमुख अतिथी म्हणून योगिता तुळणकर नगराध्यक्षा नगर पंचायत समुद्रपूर, अतुल बावणे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, समुद्रपूर,शिला सोनारे प्रथम नगराध्यक्षा नगर पंचायत समुद्रपूर,समीक्षा सुनिल मांडवकर अध्यक्षा इंनर व्हील क्लब समुद्रपूर, प्रिया बाभुळकर योगगुरू, पतंजली योग समिती, समुद्रपूर, अनिता उगे विषय साधन व्यक्ती, राजेंद्र साबळे विज्ञान शिक्षक उपस्थित होते , सर्व पाहुण्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला शाळा समिती, सदस्य, नगर पंचायत सदस्य,पालक, गावकरी, प्रतिष्ठित नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे बहारदार संचालन प्रवीण थुल सहाय्यक अध्यापक व रंजना वरखेडे सहाय्यक अध्यापिका यांनी केले. आभार आशिष ढेकण सहाय्यक अध्यापक यांनी मानले.मुख्याध्यापक पी. एम. गायकवाड यांनी शाळेच्या उपक्रमाची माहिती विषद केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता स्वाती जांभुळे,वर्षा बोमले , प्राची बोदाडे,आशा ढवळे, लिलेश पिसे तसेच पालकांनी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here