मनवर शेख
ब्युरो चीफ
हिंगणघाट.
![]()
76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिवरा पंचायत समिती समुद्रपूर जिल्हा वर्धा येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अमोल भाऊ मुंगल यांचे हसते करण्यात आले प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री अमोल मुंगल यांनी भूषविले तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय सरपंच सौ नलिनीताई थुटे उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत हिवराचे उपसरपंच श्री उल्हास भाऊ कोटमकर ग्रामसेवक श्री श्रीराम साहेब सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य तसेच पोलीस पाटील जयंतजी वाकडे उपस्थित होते विद्यार्थ्यांना कला गुन्हा तून विकास साधता येतो असे प्रतिपादन दडमल सर यांनी त्यांच्या प्रास्ताविकेतून केले माननीय अध्यक्ष यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक यांनी आयोजक म्हणून भूमिका बजावली तसेच आर्थिक सहकार्य गावातील नागरिकांनी केले कार्यक्रमाचे संचालन श्री सहाणे सर वाघमारे सर यांनी केले तर कुमारी टिंगने मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले


