राजु कांबळे
तालुका प्रतिनिधी
समुद्रपुर
वर्धा. : नुकत्याच सेवाग्राम येथील चरखागृह मध्ये ट्रॅडिशनल शितो न्यू कराटे अँड कुबोडो ऑर्गनायझेशनचे इंडिया द्वारे संलग्नित स्व संरक्षण वर्धा जिल्हा मार्शल आर्ट कराटे असोसिएशन द्वारा “मनोज की याद मे ” नॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप 2025 चे उद्घाटन झाले या अध्यक्षीय भाषणात सावंगी येथील अर्थोपेडिस्क विभागाचे प्रमुख डॉ.संदीप श्रीवास्तव यांनी आपली भावना कराटे खेळाडू पटू समोर असी मांडली की, ” खेळ कुठलाही असला तरी त्यासाठी मानसिक संतुलन व शारीरिक क्षमता यांचा त्यासाठी योग जुळून येणे आवश्यक असते आणि या खेळासाठी होणारा सराव हा व्यक्तिमत्व विकासाचा एक पायाभूत अभ्यासक्रम ठरतो. कराटे या खेळाचे एक वैशिष्ट्य आहे म्हणजे सुरक्षितता आणि कमालीची सतर्कता यांचा ताळमेळ साधणे त्या कराटे पट्टूला आवश्यक ठरते. मुलांमध्ये चिकाटी, धैर्य, आक्रमकता, स्व – सुरक्षितता याचा वस्तू पाठ देणारा खेळ म्हणजे कराटे. अशा या कराटे स्पर्धाचे वर्धा शहरात राष्ट्रीय स्तरावरील आयोजन ही वर्धेच्या गौरवात भर टाकणारी बाब आहे.
या उद्घाटन प्रसंगी सेवाग्राम येथील पेथोलॉजी विभागाचे डॉ.अनुपमा गुप्ता मॅडम, वर्धा जिल्ह्याचे ज्येष्ठ समाजसेवक मोहन बाबू अग्रवाल, स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धेचे संरक्षक इमरान राही,डॉ. दिलीप गुप्ता, नितीन नगराळे, कविता भगत, स्पर्धेचे अध्यक्ष ट्रॅडिशनल शितो न्यू कराटे ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष सिहान शेख दत्तू, स्पर्धा तांत्रिक पंच समिती प्रमुख स्पोर्ट शोतोकान कराटे -डो असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष शिहान मंगेश भोंगाडे, ट्रॅडिशनल शितो न्यू कराटे ऑर्गनायझेशनचे मुख्य परीक्षक शिहान गणेश लांजेवार, महाराष्ट्राचे सचिव सेंसाई सुधीर रिंके व आदी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
या स्पर्धेत जवळपास 555 खेळाडू पटूंनी ची उपस्थिती असून सर्वाधिक खेळाडू खेळणाऱ्या संघात प्रथम ट्रॉफी विजेता शिहान संतोष कडपेवाले चंद्रपूर, द्वितीय ट्रॉफी विजेता शिहान गणेश लांजेवार चंद्रपूर, द्वितीय ट्रॉफी विजेता सेंसाई सुधीर रिंके नागपूर, व तृतीय ट्रॉफी विजेता सेंसाई कल्याणी भोंगाडे वर्धा यांना अनुक्रमे 5000, 3000,2000 रुपये रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
ब्लॅक बेल्ट चॅम्पियन ऑफ चॅम्पियन पुरुष गटात प्रथम स्थान अजय कान्हेरे आकर्षक ट्रॉफी व 5000 रुपये रोख,द्वितीय स्थान इलीयास शेख आकर्षक ट्रॉफी व 3000 रुपये,तृतीय स्थान अर्जुन साऊद आकर्षक ट्रॉफी व 2000 रुपये रोख तर चतुर्थ स्थान समीर देवतळे आकर्षक ट्रॉफी व 500 रुपये, तसेच ब्लॅक बेल्ट चॅम्पियन ऑफ चॅम्पियन महिला गटात प्रथम स्थान मोहिनी चूटे, द्वितीय स्थान आयूषि कूरडकर, तृतीय स्थान धनश्री धोटे यांना आकर्षक ट्रॉफी व अनुक्रमे 5000,3000,2000 रुपये रोख बक्षीस देऊन मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेचे आयोजन ट्रॅडिशनल शितो न्यू कराटे ऑर्गनायझेशनचे महासचिव शिहान क्रिष्णा ढोबळे यांनी केले तर प्रस्तावना सेंसाई सोनाली भोंगाडे, संचालन संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष सेंसाई पराग पाटील तर आभार सेन्साई रुचिका वडते यांनी मानले.
या स्पर्धेच्या यशस्वी ते करिता हिमांशू बडवाने, गोपी कोटेवार, सौरभ भगत, वासुदेव सोनटक्के, मिलिंद कांबळे, महादेव जोगे, सुनील थुल, रवी वाघमारे, राणी नेहारे, अंकिता पाहूणे, प्रिया पाचरूटकर, सानिया उरकुडे, रितेश नेहारे, रिधा पठाण, समीक्षा झाडे, समीर देवतळे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.