राजु कांबळे
तालुका प्रतिनिधी
समुद्रपुर.
समुद्रपूर: नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ द्वारा आयोजित 2024-25 सेवानिवृत्त शिक्षक सत्कार सोहळा मातोश्री आशाताई कुणावार कला वाणिज्य महिला महाविद्यालय हिंगणघाट येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्षा सौ. मायाताई चाफले राज्य संयुक्त सरचिटणीस अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. अण्णाजी आडे राज्य कार्याध्यक्ष, सौ. उर्मिलाताई बोंडे राज्य महिला आघाडी प्रमुख,सौ. सविताताई पिसे राज्य संघटक, श्री. पुरुषोत्तम गंधारे माजी कार्याध्यक्ष, श्री. अजय बोंडे, श्री. राजेंद्र ईखार अखिल वर्धा जिल्हाध्यक्ष हे लाभले होते.
![]()
या सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्यात श्री. सुरेश जोगे, श्री. गजानन राऊत, सौ. विजया महाकाळकर,श्री. यशवंत जांभारे,श्री. कवडू शेळकी, श्री. दिलीप खंडाळे, श्री. यशवंत आटे, श्री. गजानन अवचट, श्री.गणेश तडस, श्री. श्रीकांत नेरकर, सौ. सीमा भुरे, श्री. शंकर फरकाडे, श्री. अशोक महाजन,श्री. नामदेव रहाटे, श्री. विवेक नाखले, सौ. ज्योती नाखले, श्री. नरेंद्र तपासे, श्री. नरेंद्र फुलमाळी,सौ. माधुरी बोबडे, श्री.गोपाल दांडेकर, श्री. महादेव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर MCERT द्वारा आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत विशेष यश प्राप्त व विद्यार्थ्यांसाठी नवोदय बुस्टर मार्गदर्शन केल्याबद्दल श्री. गजानन सोनवणे, श्री. मंगेश डफ, कु. मयुरी देशमुख (पादाडे) कु. शुभांगिनी वासनिक, तर क्रांतीज्योती सावित्री माई फुले राज्य शिक्षण गुणगौरव पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल श्री. शरद ढगे यांचा व सोबतच UGC द्वारा प्राध्यापक पदाकरिता असलेली NET परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल डॉ. ज्ञानेश्वर वाघमारे यांचा व CET परीक्षा शिक्षण शास्त्र विषयात उत्तीर्ण केल्याबद्दल श्री. रमेश कामडी, श्री. स्वप्निल वैरागडे, कु. प्रवीना सोमकुवर या सर्वांचा सह पत्नी असा विशेष सत्कार करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाला जिल्हा नेते, तालुका अध्यक्ष, सचिव, जिल्हा महिला सचिव या सर्व पदाधिकारांची उपस्थिती प्रामुख्याने होती.


