“उल्हास नवभारत अभियान “अंतर्गत गिरड केंद्रस्तरीय मेळावा संपन्न..!

0
15

राजु कांबळे

तालुका प्रतिनिधी

समुद्रपुर

 

समुद्रपुर : पंचायत समिती समुद्रपूरच्या वतीने केंद्रस्तरीय नव साक्षर मेळावा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा गिरड येथे दिनांक 15 जानेवारी 2025 ला संपन्न झाला.

सदर केंद्रस्तरीय मेळाव्यात गिरड केंद्रातील गिरड कन्या, गिरड मुले, गिरड पेठ, जि. प. शाळा तावी, जि. प. शाळा येदलाबाद,जि. प. शाळा मोहगाव,जि. प. शाळा शिवणफळ, जि. प. शाळा शिरपूर, जि. प. शाळा आर्वी, जि. प. शाळा फरीदपूर जि. प. शाळा जोगिन गुंफा व उंदीर गाव तसेच विकास विद्यालय गिरड व कृष्णराव झोटिंग कन्या विद्यालय गिरड एकूण 14 शाळा संमिलीत झाल्या.

यामध्ये शाळेतील शिक्षकांनी स्वनिर्मित नवसाक्षर साहित्य,वाचन कार्ड,वाचन पट्ट्या,घडी चित्र, पोस्टर, धूळपाटी, अंक पट्ट्या, अक्षराचे झाड,बेरजेचे पाढे, वाक्य चक्र तसेच शासनाकडून प्राप्त बॅनर व साहित्य यांचे प्रदर्शन करण्यात आले.

या मेळाव्यात नवसाक्षर स्वयंसेवक,अससाक्षर स्वयंसेवक, मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी यांचा सहभाग होता या मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. श्याम भाऊ गाठे व श्री दिलीप झाडे आणि मुख्याध्यापिका सौ. मायाताई चाफले यांनी केले.

या मेळाव्यास गावातील पालक वर्ग व परिसरातील विध्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनी भेट दिली.

उल्हास नवसाक्षर मेळावा यशस्वी करण्यासाठी सौ. माया सवाई, कु. मनीषा जांभुळे, कु.सीमा शेख, कु.भारती डकरे, कु.नंदा परिसे, कु. प्रीती कोंडावार,कु. सोनू गजभिये, कु. शिल्पा नागुलवार, श्री. राजेंद्र झाडे,श्री. संतोष मरसकोल्हे,श्री. राजु कांबळे वि .वी. गिरड सर,श्री. विलास चाचरे श्री.तुकाराम मुंढे राजेंद्र,श्री. कागे, श्री. रत्नाकर डेकाटे,श्री. सुनील बोरकर, श्री. सुदाम थोरात, श्री. देवेंद्र सातपुते, श्री. चंद्रकांत उमाटे,श्री. बनसोड सर यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे संचालन श्री. दिलीप महाजन सर व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. सुषमा डफ यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here