वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज 56 वा पुण्यस्मरण सोहळा व संत गाडगे महाराज पुण्यतिथी महोत्सव तथा नागदिवाळी महोत्सव संपन्न.!

0
14

राजु कांबळे

तालुका प्रतिनिधी

समुद्रपुर

   

गिरड : श्री गुरुदेव सत्संग सेवा मंडळ आलेसुर तालुका भिवापूर जिल्हा नागपूर यांच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज 56 वा पुण्यस्मरण सोहळा व संत गाडगे महाराज पुण्यतिथी महोत्सव तथा नाग दिवाळी महोत्सवाच्या निमित्ताने राज्यस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचे व विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 11 जानेवारी ते 16 जानेवारी 2025 पर्यंत हनुमान व सामुदायिक प्रार्थना मंदिर आलेसुर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

या कार्यक्रमांमध्ये ज्यांनी वंदनीय राष्ट्रसंताचे साहित्य घराघरात पोहोचवण्याचे अविरत कार्य केले सोबत सर्व संत महंत यांची शिकवण लहाण्यापासून तर थोर मोठ्या पर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणाऱ्या अनेक व्यक्तींचा गुणगौरव या महोत्सवा मध्ये करण्यात आला होता.

या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती म्हणून प्रमुख पाहुणे लाभलेले सौ. मुक्ताताई कोकडडे अध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर, माननीया कुंदाताई राऊत उपाध्यक्षा जिल्हा परिषद नागपूर, सौ.रश्मीताई बर्वे माजी अध्यक्षा जिल्हा परिषद नागपूर, श्री शंकरजी दडमल सदस्य जिल्हा परिषद कारगाव सर्कल, श्रीमती नंदाताई नन्नावरे माजी जिल्हा परिषद सदस्य, श्री. दिलीपजी घोडके सरपंच ग्रामपंचायत आलेसुर, सौ. मंदाताई ढोके माजी सरपंच ग्रामपंचायत आलेसुर, जिल्हा परिषद उच्च माध्यमिक केंद्र शाळा नांद मुख्याध्यापक श्री. सुभाषजी ननावरे सर, श्री. अंकितजी गायकवाड, श्री. प्रफुलजी ढोके या सर्व पाहुणेमंडळीच्या हस्ते आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रसंताचे विचार घराघरात पोहोचविणारे सोबतच ग्रामगीता जीवन विकास परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत सर्व संत साहित्य पोहोचवण्याचे अविरत कार्य करणारे हरिभक्त पारायण डॉ. श्री. विष्णु महाराज ब्राह्मणवाडे, हरिभक्त पारायण सुश्री कविताताई येनुरकर संपूर्ण देशभरामध्ये वंदनी महाराजाचे साहित्य पोहोचविण्याचे कार्य करीत आहे सोबतच श्री गुरुदेव सेवा मंडळाचे निर्भिड, निडर एकनिष्ठ गुरुदेव प्रचारक सौरभ दादा रवींद्रजी शेळके या सर्वांना सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.

वंदनीय महाराजांच्या साहित्याचा प्रचार प्रसार करणाऱ्या गुणीजणांचा सत्कार या मंडळाच्या माध्यमातून अशा लोकांची दखल घेऊन केला जात आहे. आणि खरंच आज आलेसुर हे गाव नागपूर जिल्ह्यामध्ये कार्य करीत या गावात राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्ती व नाविन्यपूर्ण उपक्रम श्री गुरुदेव सत्संग सेवा मंडळ तथा सर्व ग्रामवासी यांच्या माध्यमातून राबवल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here