राजू कांबळे
तालुका प्रतिनिधी
समूद्रपुर
समुद्रपूर. : नुकत्याच नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस क्रीडा शरीर सौष्ठव स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत दिपचंद स्कूल सेलूची माजी विद्यार्थ्यांनी व 2011 ला पोलीस दलात स्पोर्ट कोट्यातून निवड झालेली सुनयना विष्णू डोंगरे हिने सुवर्णपदक पटकाविले होते.
नंतर झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता लखनौ साठी निवड होऊन येथे सुद्धा द्वितीय क्रमांक पटकावून रजत पदकाची मानकरी ठरली. आणि या उत्सूंग कामगिरीवर इंग्लंडमधील बर्किंमहम येथे 27 जून ते 6 जुलै 2025 दरम्यान होत असलेल्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स स्पर्धे करिता निवड झालेली आहे. त्या पाठोपाठ राजस्थान येथील संजू कुमार सुद्धा पात्र ठरली आहे.
भारतातून पहिली महिला शरीर सौष्ठव स्पर्धक म्हणून मानकरी ठरली. ही आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धा ” गेम्स ऑफ हिरोज ” म्हणून जगविख्यात आहे. या सर्व प्रशंसनीय कामगिरी करिता सूनयनाचे मुंबई येथील प्रशिक्षक सुभाष पुजारी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे.
या मोलाच्या कामगिरी करिता आपल्या यशाचे श्रेय आई अनिता डोंगरे व वडील विष्णूजी डोंगरे आणि मुंबईचे प्रशिक्षक सुभाष पुजारी सर यांना देते. या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल वर्धा पोलीस दलासह सेलू तील सर्व सुजाण नागरिकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.


