Home Breaking News विद्या विकास महाविद्यालय द्वारा स्व. पांडुरंगजी तुळसकर साहेब यांचे स्मृतीप्रीत्यर्थ युवा कीर्तनकार...

विद्या विकास महाविद्यालय द्वारा स्व. पांडुरंगजी तुळसकर साहेब यांचे स्मृतीप्रीत्यर्थ युवा कीर्तनकार मा.श्री. सोपानदादा कनेरकर यांचे”जागर युवा अस्मितेचा”या विषयावर कौटुंबिक संवाद

0
52

प्रमोद झिबड

विशेष प्रतिनिधि 

गिरड 

समुद्रपूर 09जानेवारी 25:  कौटुंबिक प्रबोधनाची आजच्या काळात असलेली गरज ओळखून,विद्या विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. पांडुरंगजी तुळसकर साहेब यांचे स्मृतीप्रीत्यर्थ शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 ला प्रखर विचारवंत, युवा कीर्तनकार, ख्यातनाम वक्ते व लाखो युवकांचे प्रेरणास्थान मा.श्री. सोपानदादा कनेरकर यांचे”जागर युवा अस्मितेचा” या विषयावर कौटुंबिक संवाद कार्यक्रम विद्या विकास महाविद्यालय, समुद्रपूर येथे दुपारी १२ वाजता आयोजित केलेला आहे.सोबतच सम्राट कार्य आमदार समीरभाऊ कुणवार यांचे यावेळी आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. विद्या विकास महाविद्यालय येथील, विद्यार्थ्यांना सामाजिक भान प्राप्त व्हावे या करिता प्रखर विचारवंत,ख्यातनाम वक्ते युवा किर्तनकार मा. सोपान दादा कानेरकर (मोर्शी जि.अमरावती) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम सहकुटुंब सहपरिवार घेऊन ऐकण्या सारखे आहे.तेव्हा विद्यार्थी व त्यांचे पालकांसाठी हा कार्यक्रमआयोजित करण्यात आला आहे. सोबतच हा कार्यक्रम सर्वांसाठी पण खुला राहील.कार्यक्रमाला सहकुटुंबानी ऐकावाअसे आव्हान विद्या विकास महाविद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष साहेब डॉक्टर उमेश पां.तुळसकर, संस्थेच्या सचिव तथा उप प्राचार्य डॉ. नयना शिरभाते (तुळसकर) प्राचार्य डॉ.किशोरचंद्र रेवातकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here